

पनवेल : तलवारीने वार करून लाकडी काठ्या आणि बांबूने मारहाण केल्या प्रकरणी चौघां विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दारु पिण्यासाठी दिली नाही या कारणावरुन हा हल्ला झाला.
सुदर्शन खंडागळे, रोहित होळकर, विपुल आणि विवेक शिंदे अशी चौघांची नावे आहेत. विशाल सिंह कुवर बहादुर सिंह हा तळोजा येथे राहत आहे. तो देशी दारू विक्रीचा व्यवसाय करतो. खारघर रेल्वे स्टेशन जवळ रिक्षा चालवणारे सुदर्शन खंडागळे व त्याचे मित्र विवेक शिंदे, रोहित होळकर व विपुल हे त्यांच्याकडून देशी दारू विकत घेत असत. सात डिसेंबर रोजी सुदर्शन खंडागळे यांनी झोपेतून उठवून देशी दारू मागितली यावेळी दारू संपली असून उद्या आला तर भेटेल असे सांगितले. यावेळी सुदर्शन याने शिवीगाळ केली. त्यानंतर सुदर्शन, विवेक, रोहित आणि विपुल हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रात्रीच्या प्रकाराबाबत जाब विचारला. यावेळी सुदर्शन खंडागळे याने तलवारीने डोक्यावर डाव्या बाजूला घाव घालून दुखापत केली आणि त्याच्या मित्रांनी लाकडी काठी आणि बांबूने मारहाण केली. यावेळी अरुण आणि रायकुमार हे बाहेर आले त्यावेळी सुदर्शन याने त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले आणि काठीने मारहाण करून जखमी केले.