Raigad Crime | एकाच परिसरातील सहा तरुण बेपत्ता, पोलिसांसमोर नवे आव्हान

Missing Case Birwadi Dhalkathi | गेल्या चार महिन्यात सहा तरुणांनी घर सोडलं
 Missing Case Birwadi Dhalkathi
एकाच परिसरातील सहा तरुण बेपत्ता, पोलीसांसमोर नवे आव्हानFile Photo
Published on
Updated on

महाड(जि. रायगड) : मागील चार महिन्यात महाड तालुक्याच्या बिरवाडी ढालकाठी परिसरातून सहा तरुणांनी घर सोडून जाण्याचा घेतलेल्या निर्णयाने पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. प्रमोद सुभे या २५ वर्ष तरुणांनी मम्मी पप्पा मी तुम्हाला खूप त्रास दिला अशा आशयाचे पत्र घरात लिहून घर सोडून गेल्याची सहावी तक्रार महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे.

मागील काही दिवसापासून महाड तालुक्यातील बिरवाडी येथून आत्तापर्यंत सहा तरुणांनी घर सोडलं असून याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार देखील दाखल झाल्या आहेत. दोन दिवसापूर्वी कुंभारवाडा येथून एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पहाटेच्या सुमारास ढालकाठी येथून एक २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. प्रमोद चंद्रकांत सुंभे असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून प्रमोद याने घरातील कोणालाही काहीही एक न सांगता घर सोडलं.

मम्मी पप्पा मी तुम्हाला खूप त्रास दिला

मात्र घर सोडण्यापूर्वी त्याने आपल्या बेडरूममध्ये एक चिठ्ठी लिहिली होती व त्या चिट्ठी मध्ये मम्मी पप्पा मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे, यापुढे तुम्हाला कधीही त्रास देणार नाही, तसेच तुम्ही स्वतःची काळजी घ्या असा मजकूर लिहिण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तरुण कोणाला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन 

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर.व्ही. जाधव या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत असून प्रमोद सूंभे हा तरुण कोणाला आढळल्यास महाड एमआयडीसी पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news