Raigad crime| पोलादपूरमध्ये अवैध गुरांची वाहतूक उघड; चार गुरांसह पिकअप पोलिसांच्या ताब्यात

गुरांच्या वाहतुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे
Raigad crime| पोलादपूरमध्ये अवैध गुरांची वाहतूक उघड; चार गुरांसह पिकअप पोलिसांच्या ताब्यात
Published on
Updated on

पोलादपूर : तालुक्यातील कापडे गावाच्या हद्दीत अवैधरित्या गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोरक्षकांनी तत्पर कारवाई करत एक पिकअप वाहन अडवले. या कारवाईत चार गुरांसह संबंधित वाहन पोलादपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Raigad crime| पोलादपूरमध्ये अवैध गुरांची वाहतूक उघड; चार गुरांसह पिकअप पोलिसांच्या ताब्यात
Nashik Illegal Cattle Transport | जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे गजाआड

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून चार गुरे घेऊन जाणारी MH 13 CE 1976 क्रमांकाची पिकअप गाडी कापडे गावाच्या हद्दीतून जात होती. गुरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये चार गुरे आढळून आली.यानंतर गोरक्षकांनी संबंधित वाहन व गुरे पोलादपूर पोलीस ठाण्यात जमा केली. या प्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली असून, गुरांच्या वाहतुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

Raigad crime| पोलादपूरमध्ये अवैध गुरांची वाहतूक उघड; चार गुरांसह पिकअप पोलिसांच्या ताब्यात
Chandrapur News | गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक उधळली; ५३ जनावरांची सुटका, २२.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार अनुज शिंदे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गुरांच्या वाहतुकीमागील नेमके कारण, संबंधित व्यक्तींची भूमिका तसेच वाहतुकीची कायदेशीरता याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांच्या पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news