Raigad Crime | रेल्वेने नेरळमध्ये यायचा अन् बाईक चोरून जायचा

पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Raigad Crime , Motorcycle thief arrested
नेरळ पोलिसांनी आरोपीला अटक करत पाच मोटारसायकल जप्त केल्या आहेत.Phudhari Photo

रायगड : मुंबईतील कुलाबा येथून रेल्वेने रायगड जिल्ह्यात येऊन पनवेल आणि नेरळ परिसरात मोटारसायकलची चोरी करणाऱ्या मुंबई- कुलाबा येथील सचिन सुनील सोनावणे या ३२ वर्षीय तरुणास नेरळ पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ७ जून २०२४ रोजी ७ वाजण्याच्या सुमारास नेरळ रेल्वे स्टेशन पूर्व येथील निर्माण नगरी सोसायटीच्या मोकळ्या जागेतील पार्किंग ठिकाणाहून एक मोटारसायकल कोणीतरी चोरी केली होती.

याबाबत तक्रारदार कर्जतमधील चोरावळे येथील चिराग रामचंद्र धुळे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात २७ जून २०२४ रोजी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा उघडकीस आणणेकामी नेरळ पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि ढवळे यांनी गुन्ह्याचा तपास पोहवा प्रविण लोखंडे यांचेकडे देवून डीटेक्शन पथकाचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, सहा. फौजदार किसवे, पोलीस शिपाई निरंजन दवणे, पोलीस शिपाई राजेभाउ केकाण, विनोद वांगणेकर, प्रशांत बेले यांना मार्गदर्शन केले.

गुप्त बातमीदाराच्या मदतीने गुन्हा उघडकीस

संबधित पथकाने घटनास्थळी कोणत्याही प्रकारे तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना गुप्त बातमीदाराच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणला. २८ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गुन्हयातील आरोपी सचिन सुनिल सोनावणे (वय-३२ वर्षे, रा. पुलाबा, मुंबई) यास अटक करण्यात आलेली आहे. या गुन्हयाचा तपास रायगड पोलीस अधीक्षक सोमराव पार्ने, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला असून गुन्हा उघडकीस आणणेकामी व चोरलेल्या ५ मोटार सायकल हस्तगत करणेकामी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक शिवाजी दवाले, पोलीस उपनिरीक्षक लिगमा सरगर पोलीस उपनिरीक्षक समीर लांडे, सहा. फौजदार किसने, पोहना प्रविण लोखंडे, पोसि निरंजन दलगे, पोशि राजेभाठ केकाण, पोशि विनोद बांगणेकर, पोप्ति प्रशांत बेले, पोल्या अक्षय पाटील, नेगसायबर क्राईम रायगड अलियाग यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news