खालापूर ः खालापूर तालुक्यातील अॅमेझॉन कंपनीच्या लोहप येथील गोडावून मधील सुमारे 3 लाख 82 हजार 600 रुपये किमतीचा माल चोरून नेणार्या संजय गंगा मंडल( सध्या. रा.इंदिरानगर सर्कल तुर्भे मूळ बिहार) सुभाष लाले यादव (रा.इंदिरानगर सर्कल तुर्भे मूळ उत्तर प्रदेश) व महादू राजू उपले (रा. तुर्भे मूळ बुलढाणा) या तिघांना रसायनी पोलिसांनी कौशल्याने तपास करत बेड्या ठोकल्या आहेत.
11 ऑगस्ट रोजी गोडावून मध्ये चोरी झाल्याची तक्रार रसायनी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. रायगड पोलीस अधीक्षक रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस पथकाची नेमणूक केली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता एक संशयित टेम्पो बद्दल माहिती मिळाली. या टेम्पो चा शोध लावण्यासाठी पोलीस पथकाने पासून नवी मुंबई पर्यंत मुख्य 28 सीसीटीव्ही तपासले. टेम्पो टेम्पोच्या मालकाचा शोध लागल्यावर टेम्पोचे मालक यास चौकशीकामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने त्याचा टेम्पो हा रात्रीच्या वेळी संजय गंगा मंडल यास पुठ्ठा वाहण्यासाठी भाड्याने देत असल्याचे सांगितले. पोलिसांनी संजय मंडल यास ताब्यात घेतल हिसकएादोन साथीदार सुभाष यादव आणि महादू उपले यांच्या मदतीने चोरी केल्याचे कबुली दिली. ही कारवाई संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर महेश धोंडे, लालासाहेब कोळेकर सचिन चौरे या पथकाने केली.