Raigad | रोहे शहरावर सीसीटीव्हीची करडी नजर

मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण; 100 सीसीटीव्ही बसविण्यात येणार

CCTV eyes on Rohe city
रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीत 100 सीसीटीव्हीचे लोकार्पण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्तेकरण्यात आले.Pudhari Photo
Published on
Updated on

रोहे : रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीत 100 सीसीटीव्ही मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले असून याचे लोकार्पण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले. त्यामुळे रोहा शहरावर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार असून या सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी मदत होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) निधीअंतर्गत रोहा शहरात विविध ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावणे, कंट्रोल रूम उभारणे व अनुषांगीक सुविधा तयार करणे या कामाचा लोकार्पण ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा.आ.अनिकेत तटकरे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, रोहा पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौडकर, रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, नगरपरिषद मुख्याधिकारी अजयकुमार एडके, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोलटकर, राजेंद्र जैन, अहमद दर्जी, मयूर दिवेकर, रोहा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, रोहा नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

रोहा अष्टमी नगरपरिषद व रोहा पोलीस ठाणे अंतर्गत बालाजी इंटरनेट लोखंडवाला मुंबई या कंपनीच्यावतीने तसेच रोहा सेफ सिटी सीसीटीव्ही सर्व्हेलेन्स मार्फत 29 ठीकाणी रोहा शहरातील बाजुस व बाहेरील बाजुस येणा-या इंट्री पॉइंटवर 100 कॅमेरे बसविण्यात आले असून बाबतचे मॉनेटरींग रोहा पोलीस ठाणे येथ देण्यात आले आहे.

एकूण चार स्कीनवरती प्रत्येकी 25 कॅमेरे देण्यात आले आहेत. सदर कॅमे-यांचा डाटा साठवणुक क्षमता 45 दिवसांची आहे.

सदर कॅमे-यामध्ये 4 पीटीझेड कॅमेरे हे कॅमेरे 360 डीग्रीमध्ये फिरून छायाचित्रण करतात व 4 एएनपीआर कॅमेरे हे कॅमेरे गाडयांचे कलर व गाडयांचे मॉडेल ओळखतात. गाडयांचे नंबरप्लेट दर्शविण्याचे काम करतात. सदर बसविण्यात आलेले कॅमे-यांचा उपयोग गुन्हयांना आळा घालण्यास तसेच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उपयोग होणार

आहे.

लोकार्पण सोहळा झाल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी केली.

रोहा शहरातील हनुमान टेकडी व या परिसरात सुशोभीकरण झाल्यानंतर या ठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. याचे मॉनिटरिंग रोहा पोलीस ठाण्यात देण्यात येणार आहे.

- आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री

शहरात सीसीटीव्ही बसवल्यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे. त्याचबरोबर पोलिसांना तपासात सहकार्य होणार आहे.

- सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news