Power Theft Raigad | सीबीडी-बेलापूर, उलवे परिसरात ६३ लाखांची वीजचोरी उघड; महावितरणची धडक कारवाई

ऑगस्टमध्ये सीबीडी-बेलापूर व उलवे परिसरातील २२ प्रकरणांत ७६.८५ लाखांची वीजचोरी पकडली
  Electricity Theft
Electricity Theft AI photo
Published on
Updated on

CBD Belapur Electricity Theft

पनवेल : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सीबीडी-बेलापूर आणि उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आली आहे. ऑगस्ट महिन्यात सीबीडी उपविभागाने केलेल्या कारवाईत २२ वीजचोरीची प्रकरणे समोर आली असून, तब्बल १ लाख ९० हजार ७५७ युनिट विजेची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. या वीजचोरीची किंमत ७६ लाख ८५ हजार रुपये असल्याचे महावितरणने सांगितले.

यामध्ये उलवे परिसरातील दोन प्रकरणे विशेष गंभीर ठरली. एका प्रकरणात ५१ लाख ४१ हजार रुपये, तर दुसऱ्या प्रकरणात ११ लाख ८४ हजार रुपये किमतीची वीजचोरी आढळली. या दोन प्रकरणांत मिळून ६३ लाख २५ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. संबंधितांकडून वीजचोरीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

  Electricity Theft
Raigad Road News : पालिकेची गाडीच खड्ड्यात रुतली! कामोठे सेक्टर २० मधील सेंट्रल बँक चौकातील रस्त्याच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश

भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांच्या आदेशानुसार वीजचोरांविरोधात विविध भागांत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. वाशी मंडलचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास बेडगकर आणि सीबीडी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत बाणाईत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान वीज कायदा २००३ मधील कलम १३५ अंतर्गत २२ प्रकरणे आढळून आली. मीटरमध्ये फेरफार करणे, रेझिस्टन्स बसविणे, मीटर बायपास करणे तसेच सर्व्हिस वायरला टॅप करून वीज वापरणे, अशा विविध पद्धतींचा वापर केल्याचे तपासात समोर आले.

ही कारवाई अभियंते अश्लेषा रोकडे, गौरी वझरकर, माधुरी भोसले, रवींद्र नाहीदे, हेमंत जाधव आणि अविनाश आभाळे यांच्या पथकाने केली.

  Electricity Theft
Raigad News: नको ते हाल, नको ती वेठबिगारी! आंध्र प्रदेशातील कोळसा खाणींतून रायगडच्या ३९ कातकरी बांधवांची थरारक सुटका

मोहीम आणखी तीव्र करणार

मीटरमध्ये फेरफार करून किंवा अन्य मार्गाने वीजचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. ग्राहकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अधिकृत पद्धतीने वीज वापरावी, असे आवाहन मुख्य अभियंता संजय पाटील यांनी केले. तसेच वीजचोरांविरोधातील तपासणी मोहीम यापुढे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वीजचोरीची रक्कम व दंड विहित मुदतीत न भरल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news