

अलिबाग : अलिबाग कोळीवाडा येथील गोरगरिब मच्छीमारांना दीड कोटीचा गंडा घालणारा रत्नागिरी येथील तोतया व्यापार्याला अलिबाग पोलिसांनी अटक केली. नायब मजिद सोलकर,(पो.नाटे, ता.राजापूर, जि. रत्नागिरी ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नायक सोलकर याने 9 सप्टेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत अलिबाग येथील लक्ष्मण सारंग, रणजित भगवान खमीस,, प्रदोश गोरखनाथ तांडेल, विषाल हरिश्चंद्र बना रा.अलिबाग कोळीवाडा यांच्याकडून खरेदी केली होती.त्या बदल्यात या सर्व व्यापार्यांना नायक सोलकर याने 1 कोटी 52 लाख रुपये देणे होते.मात्र,वांरवार मागणी करुनही नायक सोलकरने अलिबागच्या मच्छीमारांना मच्छीचे काहीच पैसे दिले नाहीत.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या मच्छीमारांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अलिबाग पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.182/2024, भा.द.वि.कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 5 महिन्यापासून नमुद आरोपी हा त्याचा मोबाईल बंद ठेवून फरार झाला होता.या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी, विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेचअलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, यांच्या आदेशानुसार या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी हे करीत होते.