Raigad News : पोलादपुरात दुचाकी स्लिप झाल्याने तरुण गंभीर जखमी

Raigad News : पोलादपुरात दुचाकी स्लिप झाल्याने तरुण गंभीर जखमी
Published on
Updated on

पोलादपूर : पोलादपूर शहरातील सर्विस रोडवर दुचाकी स्लिप होऊन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगलमूर्ती पार्क एचडीएफसी बँकेसमोर बुधवार रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जय धोंडू कदम रा. महालगुर हा कामानिमित्त एक्टिवा दुचाकी घेऊन सर्विस रोड वरून जात असता दुचाकी स्लिप झाल्याने तरुण डिव्हायडर वर आढळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती समजतात पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवलदार संदीप कदम आणि पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉक्टर राजेश सलागरे यांनी प्राथमिक उपचार करून पनवेल एमजीएम हॉस्पिटल येथे अधिक उपचारासाठी हलविले आहे.

दरम्यान पोलादपूर शहरातील महामार्ग लगत असणाऱ्या पूर्व पश्चिम दोन्ही बाजूने सर्विस रोड वर दोन वाहने पास होताना तारेवरची कसरत करावी लागत असून महामार्गालगत दोन्ही बाजूने स्कायवर ब्रिजचे काम सुरू असून वाहनांची वर्दळ यामुळे एखादी मोठा अपघात होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. याकडे स्थानिक प्रशासन व महामार्ग अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news