

पनवेल : टँकरने स्कुटीला दिलेल्या धडकेत बोरले येथील हरिश्चंद्र महादेव पाटील (वय 56) यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी टँकर चालक रावेंद्र उदयराज सिंग (रा. नागोद, सतना, मध्य प्रदेश) याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पनवेल तालुक्यातील बोरले- अजिवली येथील हरिश्चंद्र महादू पाटील हे 21 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या ताब्यातील स्कुटीवरून जुना पुणे मुंबई हायवेने जेएनपीटीकडे जाणार्या लेनवर देवनारायण इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या समोर, कोळखेगाव बस स्टॉप येथे आले. यावेळी पाठीमागून आलेला टँकरने भरधाव वेगाने स्कुटीला पाठीमागून ठोकर मारली. या अपघातात डोक्यावरून चाक गेल्याने हरिश्चंद्र महादू पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल शहर पोलिसांनी आरोपी रावेंद्र सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.