माणगाव : माणगाव-पुणे रस्त्यावर खर्डी गावच्या हद्दीत साबळे क्रेशर जवळ माणगाव या ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
सदरील घटना गुरवार, 17 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद सहदेव रामचंद्र सोंडकर वय - 63 रा. भादाव, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद देणारे सहदेव रामचंद्र सोंडकर यांचा मयत भाऊ मधुकर रामचंद्र सोंडकर वय -56 रा. नवेनगर निजामपूर, ता. माणगाव हे आपल्या ताब्यातील होंडा क्टिवा स्कूटी ही गाडी निजामपूर ते माणगाव अशी चालवीत घेऊन जात असताना त्यांची गाडी माणगाव जवळील खर्डी गावच्या हद्दीत साबळे क्रेशर जवळील वळणाच्या रस्त्यावर आल्यावर समोरून येणार्या अज्ञात वाहनावरील चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन हे अती वेगाने चालवून मयत यांच्या स्कुटीला धडक लागून अपघात घडला.
या अपघातात मयत मधुकर सोंडकर यांच्या मानेच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू होऊन अज्ञात वाहनावरील चालक पळून गेला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.