

खांब : रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे परिसरात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याने परिसरातील शाळा,तसेच शिक्षण संस्थाचालक तसेच गावातील नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही टोळी सक्रिय झाल्याने खांब देवकान्हे परिसरातून नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे गावातली तसेच शाळकरी मुलांच्या जीवाला धोका असल्याने थेट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पोलिस बंदोबस्त लावण्याची मागणी या परिसरातून व्यक्त केली जात आहे.
गुरूवारी 4 जुलै रोजी या परिसरातील सदैव रहदारीचा मार्ग असलेल्या खांब देवकान्हे मार्गावरील धानकान्हे नजिक विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेत सकाळी दहा सुमारास एक अनोळखी इसम दुचाकी सोबत चेहर्यावर मास्क लावून उभा राहिला होता त्याच बरोबर तेथून थोड्या अंतरावर खांब कडे जाणार्या दिशेने दुसरी एक चार चाकी कार घेऊन दोन अनोळखी इसम होते तर येथूनच बाहे देवकान्हे कडून श्रमिक विद्यालय चिल्हे या शालेले पाचवी सहावीत शिक्षण घेत असलेले विदयार्थी जात असताना मध्येच दुचाकी वाहन जवल उभ्या आसलेल्या अनोळखी इसमाने त्या मुलांना अडवून चॉकलेट घ्या असे म्हणत पुढे असलेल्या चारचाकी वाहन चालक इसमाला इशारा केला मात्र शाळकरी विदयार्थी यांची गांभीर्यपूर्वक सतर्कता त्यामुळे ते विदयार्थी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या चॉकलेटला बळी न पडता हातामध्ये आसलेल्या सायकल तिथेच सोडून पळ काढत शाळेतील गेट मध्ये प्रेवश करताच दुचाकी आणि चारचाकीवाले इसम बोंब होण्याच्या आता पळ काढत पसार झाल्याने घडलेल्या या सार्या प्रकारामुळे मुलांच्यात तसेच येथील ग्रामस्थ नागरिकांच्यात एकच खळबळ उडाली आहे.
तर विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार दिवसभर आपल्या शाळेतली शिक्षकांना न सांगता घरी आल्यावर आपल्या काकांना सांगीतले तर ही मोठी गंभिर बाब असल्याने हा सारा प्रकाराची माहिती शुक्रवारी शाळेतली मुख्याध्यापक शिक्षक यांना देत या मार्गावरून एका अनोळखी व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलाच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न केला होता माञ दैव बलवत्तर म्हणून तो फसला असल्याचे बोलले जाते.
तालुक्यातील ग्रामीण भाग बहुतांश लोक मोल मजुरी करणारे त्यात आता शेतात खरिपाची भात लागवड करण्याची घाई असल्याने त्यात सारे मग्न असल्याचा गैर फायदा हि टोळी सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे भविष्यात पुन्हा आशा घटना घडू नये यासाठी सदरील शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक यांना कळविले आहे तसेच आवश्यक उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
- मनोज थिटे, पोलीस पाटील बाहे
या परिसरात हायस्कूल तसेच काही प्राथमिक आणि अंगणवाडी शाळा आहेत त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे अनोळखी कोणी इसमाच्या अमिष्याला कोणीही बळी पडू नका त्याच्याकडून कोणतेही खाऊ पदार्थ घेऊ नये तसेच शाळेत ये जा करत असताना कोणतेही अनलोखी वाहवर बसून प्रवास करू नका.
- दीपक जगताप, मुख्याध्यापक श्रमिक विद्यालय चिल्हे