Raigad | रायगडमधील 15 हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र

61 लाभार्थींनी अर्ज घेतले मागे; जिल्ह्यात आतापर्यंत 66 हजार अर्ज ठरले वैध; लाभार्थींना 2100 रुपयांची प्रतीक्षा
रायगड
रायगड जिल्ह्यात जवळपास 6 लाख 332 लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

रायगड: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येत आहे.

Summary

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा दीड रुपयांची मदत शासनाकडून केली जात आहे. रायगड जिल्ह्यात जवळपास 6 लाख 332 लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्हयात 15 हजार 849 अर्ज अपात्र ठरविण्यात आहेत. तर 61 बहिणींनी स्वतहून आपले अर्ज मागे घेतले आहे. तर ज्या लाभार्थी आयटीआर भरणार्‍यांना वगळण्यात येत आहे.

जिल्ह्यात जवळपास 6 लाख 332 लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत आहे. त्यांना योजना सुरू झाल्यापासून लाभ मिळत आला आहे. मध्यंतरी या योजनेत ज्या महिला पात्र नाहीत, त्यांचा हप्ता रोखण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. तर काहींकडून वसुली केली जाणार असल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून ही रक्कम न मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तर काहींचे अर्ज आधीच रिजेक्ट झाले आहेत. दरम्यान, या योजनेतील लाभ कायम राहण्यासाठी आधार लिंक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असल्यास ते कळणार आहे.

आयटीआर भरणार्‍यांना वगळले

नुकत्याच झालेल्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनी लाभार्थी महिलांच्या खात्यावर मागील महिन्याचे हप्त जमा झाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये करणार, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते. मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता महिलांना मिळालेला नाही. सध्या महिलांना दीड हजार रुपये हफ्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने 46 हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

आयटीआर भरणार्‍यांनीही योजनेसाठी भरले अर्ज भरलेले आहेत. या योजनेत महिलांना दीड हजार रुपयांची मदत मिळणार असल्याने त्यांनी कोणताही विचार न करता अर्ज भरले. आयटीआर भरणार्‍यांनीही यात अर्ज केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशांचा शोध लागल्यानंतर त्यांनाही या योजनेतून वगळण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात रायगड जिल्ह्यात काही अडचण असल्यास त्या-त्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांशी संपर्क साधवा.

सुहिता ओव्हाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रायगड

61 बहिणींनी स्वत:हून अर्ज मागे घेतले

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत रायगड जिल्ह्यात जवळपास 6 लाख 332 लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्हयात 15 हजार 849 अर्ज अपात्र ठरविण्यात आहेत. तर 61 बहिणींनी स्वतहून आपले अर्ज मागे घेतले आहे. तर ज्या लाभार्थी आयटीआर भरणार्‍यांना वगळण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news