Raigad | बँकांनी बहिणींच्या खात्यावरील कापले पैसे, महिलांमध्ये नाराजी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून जमा झालेली रक्कम
Raigad lakdki bahin yojna
बँकांनी बहिणींच्या खात्यावरील कापले पैसे, महिलांमध्ये नाराजी
Published on
Updated on
खोपोली : प्रशांत गोपाळे

राज्य सरकारतर्फे राबवली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत रक्षाबंधनापूर्वीच ही रक्कम जमा झाल्याने महिला वर्गांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला होता. त्या रकमा काढण्यासाठी बँकामध्ये मोठी गर्दीही झाली. परंतू, प्रत्यक्षात बँकांमधून रकमा काढताना प्रत्यक्षात तीन हजार रुपयांची रक्कम हातात येत नसल्याचे महिलांच्या निदर्शनास आले आहे.

जुन्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने ते शोधण्यासाठी धावपळ होत आहे. त्यातच कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी या अटीचे पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून बँकांनी रक्कम कापण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी दंडात्मक स्वरुपाची रक्कम तर काही बँकांनी थकीत कर्जाच्या हफ्त्याची रक्कम म्हणून रक्कम वसूली केल्याचे महिलांचे म्हणने असून लाडकी बहिण योजने संपूर्ण पैसे हातात न मिळाल्याने महिलांनी जाराजी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. जुलै महिन्यापासून महिलांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी लाभार्थ्यांच्या खात्यात सरकारने प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे. रक्षाबंधनापूर्वीच ही रक्कम जमा झाल्याने महिला वर्गांमध्ये मोठा आनंद निर्माण झाला होता. त्या रकमा काढण्यासाठी बँकामध्ये मोठी गर्दीही झाली. परंतू, प्रत्यक्षात बँकांमधून रकमा काढताना प्रत्यक्षात तीन हजार रुपयांची रक्कम हातात येत नसल्याचे महिलांच्या निदर्शनास आले आहे.

कमीत कमी रक्कम खात्यात शिल्लक असावी या अटीचे पालन करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या रकमेतून बँकांनी रक्कम कापण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी दंडात्मक स्वरुपाची रक्कम तर काही बँकांनी थकीत कर्जाच्या हफ्त्याची रक्कम म्हणून रक्कम वसूल केल्याचे आढळले असून त्याबाबतच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष?

बँकेचे कर किंवा कर्जाच्या थकीत हफ्त्यांमधून वसूली या योजनेतून करू नये अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असतानाही बँकेत पैसे कापले जात असल्यामुळे महिला नाराजी व्यक्त करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news