

नेरळ : कर्जत तालुक्यात पडणार्या अतिवृष्टी दरम्यान कर्जत महावितर विभागाच्या भोंगळ कारभारामुळे दिर व भावजय यांचा महावितरणच्या विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू व एक महिला जखमी झाल्याची घटना ताजी असताना, पुन्हा एका लहान मुलाच्या अंगावर विद्युत तार पडून मृत्यूची घटना घडल्याने, कर्जत महावितरणाच्या जबाबदार अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गृन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन हे कर्जत तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट व कर्जत संर्घष समितीकडून मार्फत कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
साळोख वाडी येथील राहाणार आदिवासी रामचंद्र गोटीराम वाघमारे, व पार्वती रामचंद्र वाघमारे यांना विजेचा शॉक लागून मृत्यू तर सुनिता गोपाळ वाघमारे ही महिला जखमी झाली आहे. याशिवाय नरसापुर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावात महावितरणच्या मेन विद्युत लाईन ही शिव रूपेश भोसले या 6 वर्षीय शाळेतील लहान मुलाच्या अंगावर पडून त्याला शॉक लागून त्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या घटनेला जबाबदार असलेल्या कर्जत महावितरणाच विभागाच्या अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गृन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. या मागणीनुसा ठाकरे शिवसेना गट व कर्जत संर्घष समितीच्या माध्यमातून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदिप भोसले यांना निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेनेचे नितिन सावंत, उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख बाबु घारे, माजी नगरसेवक संतोष पाटील, आदी पदाधिकारी व मान्यवर तर कर्जत संर्घष समितीचे अॅड. कैलास मोरे, प्रशांत सदावर्ते, सतिश मुसळे आदी उपस्थित होते.