Eco-sensitive zone protest : इको सेन्सिटिव्ह झोनविरोधात संताप

रोहा तालुक्यांतील दहा गावांतील शेतकरी मंगळवारी रोहा प्रशासनाला देणार निवेदन
Eco-sensitive zone protest
इको सेन्सिटिव्ह झोनविरोधात संतापpudhari photo
Published on
Updated on

खांब : भारत सरकारच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालयाने पर्यावरण संवेदनशील घोषित क्षेत्र म्हणून रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 437 गावांचे क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे. रोहा तालुक्यातील 119 गावांचा यात समावेश येत आहे.तर ज्या गावांचा समावेश होत आहे अशा ग्रामस्थ शेतकर्‍यांना तलाठीसजा यांच्या वतीने सूचना पत्रक दिले जात आहे. त्यामुळे आता तालुक्यातील ग्रामस्थ शेतकरी एक संघटित होऊन यावर विरोध करत हरकती घेत आहेत.

चिल्हे देवकान्हे खांब विभागीय शेतकरी संघर्ष समिती संघटनेने यावर हरकती नोंदवल्या नंतर तालुक्यातील ग्रामस्थांच्या हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी धामणसई विभागातील ग्रामस्थ शेतकरी हे देखील संघटित होत रोहा तहसीलदार,प्रांताधिकारी व उपविभागीय वन अधिकारी यांना इको सिन्स्विटी झोन विरोधात हरकत घेत निवेदन सादर करत आहेत.

सोनगाव बैठकीत पिंगळसई पट्ट्यात मेगासिटी आली त्या ठिकाणी वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात इको सेन्सिटीव्ह झोनचे जमिनीवर शिक्के लागले आहेत. त्यामुळे येथील काही शेतकर्‍यांना शासनाने यावर लादलेल्या अटी शर्ती तसेच काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील जस जसे गावांना आता हे जारी केलेले परिपत्रक मिळत आहे तसतसे येथील शेतकरी ग्रामस्थ हरकत घेत असून ग्रामपंचायत देखिल हरकतीचा ठरावा मंजूर करून शासनाला त्यांच्या परिपत्रकानुसार निवेदन देत असल्याची माहिती अरुण आगळे, खेळू ढमाळ, अनंत देशमुख, संतोष खेरटकर आदींनी सभेत इको सेन्सिटिव्ह झोनवर हरकत नोंदविली. धामणसई, मालसई, मढाळी, पिंगळसई या चार ग्रामपंचायतीचे ग्रामसभेचे सर्वानुमते हरकत ठराव घेऊन ते देखील निवेदनासोबत अधिकारी वर्गाला देण्यात येणार असल्याचे या सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले.

यावेळी शेतकरी ग्रामस्थ तथा विभागीय ज्येष्ठ नेते खेळू ढमाळ, युवा नेते अनंता देशमुख, संतोष खेरटकर, अमोल देशमुख, अरुण आगळे, शिवाजी मुटके, सुशील खांडेकर, भाई भोसले, महेश तुपकर, यशवंत मोंडे, अनिल सानप, कल्पेश जंगम, वामन भोईर, रुपेश भोसले, नथुराम मालुसरे, दिनेश रटाटे, शंकर कदम,नरेश गायकर, योगेश जंगम, आदी विभागातील शेतकरी ग्रामस्थ आणि युवक मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.सोनगाव येथील सभेला दहा गावातील ग्रामस्थ शेतकरी वर्गाने मोठा प्रतिसात देत, हरकती घेण्यासाठी शासन निर्णया विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दहा गावातील ग्रामस्थांची एकजूट

तालुक्यातील 119 गावांचा समावेश असल्याने यात पिंगळसई, वांदोली, मढाळी, सोनगाव, गावठाण, धामणसई, मालसई, मूठवली, सांगडे, उडदवणे,आदी गावांचा समावेश असल्याने यासाठी विरोध दर्शवित हरकतीसाठी विभागीय ग्रामस्थ शेतकरी एकत्रित संघटित सोनगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला येथील जवळपास दहा गावातील ग्रामस्थ शेतकरी वर्गाने मोठा प्रतिसात देत उपस्थिती दर्शवली . त्यावर हरकतीचा पवित्र घेण्यासाठी येथील ग्रामस्थ या निर्णया विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

याबाबत मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी, वन विभाग, जिल्हाधिकारी, तसेच , खा. सुनील तटकरे, खा. धैर्यशील पाटील यांना देखील निवेदन देण्यात येणार असल्याचे सदरच्या महत्वपूर्ण सभेत सर्वानुमते सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news