Mumbai-Goa highway potholes : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा खड्डे

पालकमंत्री नसल्याने रायगडमधील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
Mumbai-Goa highway potholes
मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा खड्डेpudhari photo
Published on
Updated on

खांब : श्याम लोखंडे

गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र आजतागायत ते पूर्ण झालेले नाही. मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड अतोनात हाल होत त्यामुळे सर्वत्र एकच संतापाची लाट उसळत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे आणि यावेळीही कारण ठरतेय ते म्हणजे महामार्गावरील खड्डे. काही ठिकाणी केलेली खोदाई ही डोके दुखी ठरत आहे तर मार्गावरील उड्डाण पुलांचे काम तसेच सर्व्हिस रोड आणि गटारांची कामे ही काम करत असलेल्या ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे वाहन चालकाना धोकादायक आणि अपघाताचे कारण ठरत आहेत.

गेल्या सोहळा सतरा वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र आजतागायत ते पूर्ण झालेले नाही. अधुरी कामे, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि अपूर्ण उड्डाणपूल यामुळे प्रवाशांचे हाल मात्र कायम आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी हा मार्ग आता त्रासदायक ठरत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू अस लेले चौपदरीकरणाचे काम वर्षानुवर्षे रखडल्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस पेण ते इंदापूर दरम्यान बिकट अवस्था निर्माण झाल्याने एकच संतापाची लाट उसळली आहे.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील पाहणी करतात मात्र रायगडसाठी या सरकारच्या कारकीर्दीत पालकमंत्रीच नाही त्यामुळे वाली कोण असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नागोठणे, खांब, कोलाड आंबेवाडी नाका, तळवली तिसे रातवड इंदापूर या ठिकाणी अक्षरशः मार्गाची चाळण झाल्याचे पहावयास मिळत आहे. तर खांब, कोलाड आंबेवाडी नाका, तळवली तिसे दरम्यान तर चार ते पाच फूट खोल खड्डा पडला असल्याने चारचाकी वाहने त्यात अडकून बंद पडत असल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. सदरील खात्याचे अधिकारी वगनि यावर लवकरात लवकर उपाय योजना करून पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.

सर्व्हिस रोड मोठ्या खड्ड्यांनी पोखरले आणि भयानक पडलेले खड्डे दुचाकी स्वार यांना करावी लागते तारे वरची कसरत. खड्ड्यांमुळे काही ठीक ठिकाणी दुचाकीस्वाराला मार्गक्रमण करतांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर अंधारात या खड्ड्यांमुळे त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याचे समजते तर चारचाकी आणि प्रवासी रिक्षा या सदरील खड्ड्यात अडकून बंद पडत असल्याने मोठा संताप प्रवासी नागरिक यांच्याकडून केला जात आहे.

महामार्गावरील काँक्रिटचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले असले तरी रायगड जिल्ह्यातील माणगाव इंदापूर बायपास, कोलाड, लोणेरे, पुई आणि खांब नागोठणे या महत्त्वाच्या ठिकाणी पूल आणि बायपासचे सर्व्हिस रोडचे काम आजही अपूर्ण आहे. काही ठिकाणी काम सुरू असतानादेखील रस्त्याच्या कडेला बनवण्यात आलेले सर्व्हिस रोड मोठ्या खड्‌ड्यांनी पोख-रले गेले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा संताप उफाळून येतोय. कोलाड खांब दरम्यान गोवे गावाकडे जाणारा मार्ग हा अद्याप रडकथेत तर महिसदरा नदीपात्रावरील पूल उभारल्याने मार्ग अधिक उंचीवर गेल्याने गोवे गोवे गावाकडे रस्ताच गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

  • रायगड जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अनेकदा रस्त्यावर उतरले. आंदोलने केली तसेच काही स्थानिक जनतेने वेळोवेळी आंदोलने करून याकडे लक्ष वेधले आहे. मात्र कामाच्या गतीत फारसा फरक पडताना दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news