

पोलादपूर : गेल्या 24 तासात पोलादपूर तालुक्यातील पावसाने पुन्हा शतकी मी मी नोंदवत श्रीकृष्णजन्म पावसाने जोरदार तडाखा देत ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत केले होते. गेल्या 24 तासात 128 मी. मी. पावसाची नोंद नोंदविण्यात आली असली तरी गेल्या काही दिवसा अधून मधून विश्रांती घेणार्या पावसाने सण उत्सवाच्या काळात पुन्हा एकदा जोरदार आगमन केले आहे. अतिवृष्टी सारख्या पडणार्या पावसामुळे ग्रामीण भागातील तसेच मुख्य बाजारपेठ असणार्या कापडे व पोलादपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.
पोलादपूर तालुक्यातील सरासरी 3 हजार 636 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडत आहे. मात्र गेल्या चार पाच वर्षात तालुक्यातील पावसाचे प्रमाणे 4 ते 5 हजार मि.मी.वर जात असल्याने जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाचा तालुका ठरत आहे पोलादपूर तालुक्यातील गेल्या 48 तासात 172 मी मी पाऊस पडला आहे. यामुळे तालुक्यातील ढवली व कामथी नद्यांनी मुसंडी मारल्याने सावित्री नदीला फुगवटा मारत आहे.
गेल्या 24 तासात तालुक्यातील चांदके- 196 मि.मी. व दाभिळ-155 मी मी, गोवेले -140 मी मी, बोरघर 112 मि.मी., कोंढवी-274 मि.मी., पळचिल-140 मी मी, किनेश्वर-295 मि.मी, गोळेगणी-158 मि.मी., पोलादपूर - 128 मी मी, सवाद- 118 मि.मी., तुर्भे कोंड- 136 मि.मी., बोरवले - 152 मि.मी. तालुक्यात पाऊस पडला असून सर्वाधिक पाऊस कोंढवी मंडळ परिसरात पडला आहे.
गेल्या 24 पडणार्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आजपर्यंतची सरासरी 2 हजार 877 मि.मी. झाली आहे. मात्र ती गतवर्षी पडलेल्या पावसाच्या तुलनेत 473 मि.मी. ने कमी आहे. वेधशाळेत दिलेल्या इशारानुसार येणार्या काही दिवसात अतिवृष्टी व रेड अलर्ट दिल्याने पोलादपूर तालुक्यातील पावसाची सरासरी वाढणार आहे. याचा फटका सण-उत्सव काळात बाजारपेठमधील व्यवसायावर होणार आहे.