Raigad News | पलचिल येथील आरोग्य केंद्र सकाळी १० वाजेपर्यंत बंद; सभापती अविनाश शिंदे यांची अचानक पाहणी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Poladpur Palchil Health Center
Poladpur Palchil Health CenterPudhari
Published on
Updated on

Poladpur Palchil Health Center

पोलादपूर : पंचायत समिती पोलादपूरचे सभापती अविनाश शिंदे यांनी गुरुवारी (दि.९) प्राथमिक आरोग्य केंद्र, पलचिल येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान सकाळी १० वाजेपर्यंत आरोग्य केंद्र बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी डॉक्टरांसह कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळले. उपचारासाठी आलेले काही रुग्ण आरोग्य केंद्राबाहेर प्रतीक्षा करत असल्याचेही दिसून आले.

सध्या पोलादपूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवा अखंड, तत्पर आणि वेळेवर उपलब्ध राहणे अत्यावश्यक असल्याचे सभापती श्री. शिंदे यांनी सांगितले. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना तातडीने सेवा देणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Poladpur Palchil Health Center
Raigad News : सावित्री खाडीवरील आंबेत पुलास दोन बार्जची धडक

आरोग्य केंद्र नियोजित वेळेत सुरू नसल्याबद्दल सभापती श्री. शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही हलगर्जीपणा करू नये तसेच नागरिकांना वेळेत उपचार व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

याशिवाय, या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकारामुळे पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सेवेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news