पोलादपूर येथील महामार्गाच्या वाढीव सर्विस रस्त्याच्या कामाची सहाय्यक अभियंता यांच्याकडून पाहणी

Road inspection: ग्रामस्थांकडून 100 मीटरची वाढीव मागणी
Poladpur highway service road inspection
पोलादपूर ग्रामस्थांनी शंभर मीटर वाढीव सर्विस रस्त्याची मागणी करत सहाय्यक अभियंता अक्षरा डहाके यांना निवेदन दिले. pudhari photo
Published on
Updated on

पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर ग्रामीण रुग्णालया समोर सुरू असणाऱ्या वाढीव सर्विस रस्त्याची पाहणी महामार्गाच्या महाड विभागीय सहाय्यक अभियंता अक्षरा डहाके यांच्याकडून अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली. यावेळी पोलादपूर ग्रामस्थांनी शंभर मीटर वाढीव सर्विस रस्त्याची मागणी करत निवेदन दिले आहे.

यावेळी सहाय्यक अभियंता अक्षरा डहाके यांच्याशी स्थानिक पत्रकारांनी चर्चा करून पोलादपूर येथील अंडरपास रस्त्यावर जाणारे येणारे वाहनांचे हादरे यामुळे आजूबाजूच्या घरांना होणारा त्रास हा विषय लक्षात आणून दिला तसेच मंजूर स्काय वॉक निश्चित जागेत तातडीने उभारणे गरजेचे असल्याचे लक्षात आणून दिले.

बरोबरच स्थानिक नागरिकांनी महामार्गालगत दोन्ही बाजूला शहरात असणारे सर्विस रस्ते हे किमान 21 फुटा ऐवजी काही ठिकाणी 16 फूट असल्याने एसटी बसेस जाताना येताना होणारी अडचण लक्षात आणून दिली. तसेच चोळई येथील स्थानिक पत्रकार प्रकाश कदम यांनी येथील महामार्गावर असणारे गतिरोरोधक हे स्काय वॉक जवळ करणे गरजेचे आहे मात्र गतिरोधक हे पुढच्या बाजूला असल्याने आणि वळण असल्याने येणारी वाहने अति वेगाने जात असताना मोठा आवाज होऊन आजूबाजूच्या घरांना हादरे बसत असल्याचे निदर्शनात आणून दिले.

यावेळी शहर प्रमुख सुरेश पवार उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले , पोलादपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष सचिन मेहता, पत्रकार धनराज गोपाळ, डॉ. गुलाबराव सोनवणे, संतोष तुरडे, दत्ताराम पवार, संजय जंगम , अंकुश पवार, सिताराम जाधव , सेवानिवृत्त हवलदार पवार आधी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news