Kobbi Shoshani: अलिबागमध्ये ज्यू कधी आले? इस्रायलचे महावाणिज्य दूत काेबी शाेशानी यांनी सांगितली आठवण

India Israel Bilateral Relations: भारत आणि इस्रायल राजनैतिक संबंधांची तीस वर्षे साजरी करत आहेत.
Israel-India relations 2025
Israel-India relations 2025Pudhari Photo
Published on
Updated on

Jews in Maharashtra Alibaug

जयंत धुळप

भारतीचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या बद्दल आम्हाला माेठा आदर आहे. ते इस्रायलचे खरे मित्र आहेत. ते गुजरातचे मुख्यमंत्री हाेते तेव्हा त्यांनी इस्रायलला आवर्जून भेट दिली हाेती.तेव्हा पासून त्यांचा स्नेह इस्रायल बराेबर आहे. त्यांनी आम्हाला माेठे पाठबळ देखील दिले आहे, अशी भावना इस्रायलचे महावाणिज्य दूत काेबी शाेशानी  यांनी गुरुवारी अलिबाग येथे दैनिक पुढारी शी बाेलताना व्यक्त केली.

भारत आणि इस्रायल राजनैतिक संबंधांची तीस वर्षे साजरी करत आहेत. १९९२ पर्यंत, मुंबईतील इस्रायलचे वाणिज्य दूतावास देशातील ज्यू राज्याचे प्रतिनिधी होते. तथापि, भारतातील ज्यू समुदाय दोन हजार वर्षांहून अधिक काळ या उपखंडात राहत आहेत, छळाच्या भीतीशिवाय ज्यू  लाेक येथे सुरक्षीत आणि भयमुक्त वातावरणात ज्यू अशी आपली ओळख राखून राहीले आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी शहर आणि त्याच्या परिसरासाठी योगदान देखील दिले आहे. हे सर्व भारतीयांच्या व भारत सरकारच्या सहकार्यामुळेच हाेवू शकले. आणि म्हणूनच भारत इस्त्रायल मधील सांस्कृतीक वारसा अधिक वृद्धींगत करण्याचा उभय देशांचा प्रयत्न असून त्यांच अंतर्गत आज मी अलिबाग मधील १८४० मध्ये बांधलेल्या मागेन आबाेध या  ज्यूईश प्रार्थना स्थळाला भेट देण्यासाठी आलाे असल्याचे इस्रायलचे महावाणिज्य दूत काेबी शाेशानी  यांनी सांगितले

अलिबागमध्ये २०० वर्षांपूर्वी ज्यू लाेक आले आणि येथील निवासी झाले. अलिबाग,नवगाव, रेवदंडा, चरी येथे ते राहून व्यवसाय करित असताना येथील स्थानीक भारतीयांनी आम्हीला सामावून घेतले आणि आम्ही देखील अलिबागकर झालाे यांचा माेठा आनंद वाटत असून त्या बद्दल कृतज्ञता देखील मी व्यक्त करताे असे इस्रायलचे महावाणिज्य दूत काेबी शाेशानी  यांनी पूढे आवर्जून सांगीतले.

भारत आणि इस्त्रायल मधील हे सांस्कृतिक नाते अधिक वृद्धींगत करण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्रालयासोबत, इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने "द ज्यू रूट" चे उद्घाटन केले आहे, ज्यामध्ये सुमारे १२ स्थळे आहेत आणि जगभरातील पर्यटकांना भारतातील ज्यूंच्या वारशाला भेट देण्यासाठी  आमंत्रित केले आहे.ही स्थळे प्रो. शौल सपीर यांनी लिहिलेल्या "बॉम्बे मुंबई: सिटी हेरिटेज वॉक्स, एक्सप्लोरिंग द ज्यूइश अर्बन हेरिटेज" या पुस्तकावर आधारित आहेत. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या, मुंबईत व मुंबईच्या परिसरात असलेल्या या  ठिकाणांना जगासमाेर आणण्यासाठी आणि ज्यू समुदायांच्या इतिहासाबद्दल  जाणून घेण्यासाठी हा एक आगळा प्रवास राहाणार असल्याचे इस्रायलचे महावाणिज्य दूत काेबी शाेशानी   यांनी अखेरीस सांगीतले.

इस्रायलचे महावाणिज्य दूर शेराॅन सॅम्यूअल यांनी रेवदंडा आणि अलिबाग येथील ज्यू प्रार्थनास्थळात पारंपरिक प्रार्थना करुन या दाेन्ही ठिकाणी स्थानिक ज्यू  व  भारतीय नागरिकांबराेबर संवाद साधून येथील इतिहास जाणून घेवून उभयतांचा स्नेह वृद्धींगत हाेण्याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी येथूल स्थानिक प्रार्थना स्थळाचे प्रमुख शाेफेत आवासकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news