Phenol pollution : फिनोझॉलच्या प्रदूषणामुळे श्‍वास कोंडला

ताकईकर ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा,कारवाईची मागणी,कंपनी व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार
Phenol pollution
फिनोझॉलच्या प्रदूषणामुळे श्‍वास कोंडलाpudhari photo
Published on
Updated on

खोपोली : साजगाव गावातील युनिवर्सल इस्टेट मधील केमिकल्स उत्पादन करणारी फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स प्रा.ली.आहे. या कारखान्यात ज्वलनशील केमिकल्सच्या प्रदूषणामुळे ताकई गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. शुक्रवारी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे त्रास झाल्यामुळे ताकई गावातील तरूणांनी कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता सदर तक्रारीची दखल घेण्याचे आश्वासन कंपनीने दिले. यासंबंधीचे निवेदन खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन हिरे यांच्याकडे दिले असून प्रदुषण मंडळाकडे तक्रार करणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक केमिकल्स कंपन्यामधील प्रदूषित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जाते तसेच जमिनीत मुरते. त्यामुळे बोरवेलचे पाणीही प्रदूषित झाले आहे. साजगाव गावच्या बाजूलाच खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई गावा आहे.फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनीमधील धुराची चिमणी ताकई गावाकडे आहे, तीची उंची कमी असल्यामुळे केमिकल्सच्या उग्र वासामुळे गुदमरल्यासारखे होते, डोळ्यांना जळजळ होत आहे, उलट्या होतात. नगरपालिकेची प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना आणि गावातील नागरिकांना त्रास होत आहे.

साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक केमिकल्स कंपन्यामधील प्रदूषित सांडपाणी मोकळ्या जागेत सोडले जाते तसेच जमिनीत मुरते, त्यामुळे बोरवेलचे पाणीही प्रदूषित झाले आहे. कंपनी परिसरात वृक्षलागवड नाही. अनाधिकृत बांधकाम केले आहे, याविरोधात पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक ग्रामस्थ मनिष खवळे तब्बल बारा वर्षापासून कारवाईसाठी पत्रव्यवहार करीत आहेत. परंतु संबंधित विभागाकडून त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपन्यांना अभय दिला जात असल्याने लोकशाही दिन सुनावणीत मनिष खवळे यांनी तक्रार मांडत स्थळ पहाणी करीत पाण्याचे नमुने तपासा अशी तक्रार केल्यानंतर तहसिलदार अभय चव्हाण यांनी प्रदुषण मंडळ, आरोग्य विभाग आणि महसुल विभागाची टिम पाठवली होती, अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही.

शुक्रवरी रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात प्रदूषणामुळे त्रास झाल्यामुळे ताकई गावातील तरूणांनी कंपनीच्या विरोधात खोपोली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ.सुनिल पाटील, संदेश पाटील, चंद्रशेखर पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, मंदार पाटील, युगल पाटील यांच्यासह गावातील तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.याबाबत कंपनी व्यवस्थापनाने विचारणा केल्यानंतर बोलण्यास नकार दिले आहे.

  • फिनोझॉल स्पेशालिटी केमिकल्स कंपनीतील प्रदूषणामुळे अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. परंतु काल संध्याकाळी उग्रवासामुळे गुदमरल्यासारखे झाले, डोळ्यांना जळजळ झाली. काहींना उलट्या झाल्याची घटना घडली आहे. नगरपालिकेची प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना प्रचंड त्रास झाला आहे.अशी तक्रार ग्रामस्थ संदेश पाटील यांनी केली आहे.

सरकारी यंत्रणेचा कानाडोळा

सरकारी यंत्रणेला लेखी पत्रव्यवहार करूनही लक्ष दिले जात नाही. काल झालेल्या प्रदुषणाच्या घटनेनंतर ग्रामस्थांवर दबाव टाकून कागदपत्रे पूर्ण असल्याचे कंपनी व्यवस्थापक सांगतात. प्रदूषणाच्या धुराचे लोट गावाकडे जाताय याविरोधात अशी कोणती सरकारी यंत्रणा आहे ती कारवाई करू शकते असा सवाल पर्यावरणप्रेमी मनिष खवळे यांनी उपस्थित केला आहे.

कंपनीतील प्रदूषणामुळे अनेक दिवसांपासून त्रास होत आहे. परंतु शुक्रवारी उग्रवासामुळे त्रास झाला आहे. यासंबंधीची तक्रार खोपोली पोलिस ठाण्यात केली आहे, प्रदूषण मंडळाकडे तक्रार करणार आहोत.

डॉ सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news