PHC medicine shortage : प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

गरीब रुग्णांचे हाल; रुग्णांवर खासगी दुकानांमधून औषधे विकत घेण्याची वेळ
PHC medicine shortage
प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडाpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागत आहे. आरोग्य विभागाकडे औषधाचा साठा उपलब्ध झालेला असला तरी एनईबीएलकडून तपासणी झाल्याशिवाय वाटप करता येत नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा साठा पोहचलेला नाही आहे. मात्र यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा आरोग्याचे 56 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील नागरिक उपचारासाठी जातात. प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णांना डॉक्टर औषधे लिहून देतात. त्यांनतर रुग्ण रुग्णालयातून औषधे घेऊन घरी जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. औषधे उपलब्ध नसल्याने बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार आणि औषधे मोफत मिळतात. त्यामुळे रुग्णाची गर्दी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच असते. मात्र सध्या औषधाचा तुटवडा असल्याने रुग्णांना मनस्ताप झाला आहे. सर्वसामान्य रुग्ण हे उपचारासाठी येत असून औषधे मोफत मिळत असल्याने पैशाविना काम होत असते. मात्र औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी मेडिकल दुकानातून औषधे खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशाला आर्थिक चाट पडत आहेत.

PHC medicine shortage
HSRP number plate : एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता 30 नोव्हेंबरपयर्र्ंत मुदत

प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा साठा जिल्हा आरोग्य विभागातर्फे मागविला जातो. त्यानुसार आरोग्य विभागाने नसलेल्या औषधाचा साठा मागविला आहे. मात्र आलेली औषधे एनईबीएलकडून तपासणी करून घेतली जातात. त्यांचा अहवाल आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे साठा पाठविला जातो. मात्र जिल्हा आरोग्य विभागाकडे आलेली औषधे एनईबीएलकडून तपासणी झाली नसल्याने वाटप रखडले आहे.

PHC medicine shortage
Raigad News : प्लॅटफॉर्मच्या उंचीअभावी नागरिकांचे हाल

जिल्ह्यात काही औषधांचा साठा संपलेला आहे. संपलेला औषधे मागविले आहेत. मात्र एनईबीएलकडून अजून त्याची तपासणी झालेली नाही आहे. त्याच्याकडून औषध तपासणीचा अहवाल आल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधाचा साठा वितरीत केला जाईल.

डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news