Pen Water Pipeline: ३८ कोटींची पाणी योजना, तरी पाइपलाइन वारंवार फुटते! पेण खारेपाटात पाणीटंचाईची चिंता

वारंवार नादुरुस्त; गणेशउत्सवातच नव्या पाइपलाईन फुटीचे सत्र; ३८ लाखांचा निधी वाया?
Pen Water Pipeline
Pen Water PipelinePudhari
Published on
Updated on

वढाव : पेण-खारेपाट भागात नव्याने टाकण्यात आलेल्या पाइपलाइनचे फुटण्याचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्च करून टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने सुमारे ३८ लाख रुपयांचा निधी वाया गेला का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवीन पाइपलाइन टाकून अल्पावधीतच ठिकठिकाणी गळती व पाइप फुटण्याच्या घटना घडत असल्याने योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गणपती उत्सवाच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत राहणे अपेक्षित असताना पाइपलाइन फुटल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Pen Water Pipeline
Raigad Ganpati Visarjan: रायगडमध्ये आज ५६ हजार गणेशमूर्तींचे होणार विसर्जन; गौरी-गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पाइपलाइन फुटण्यामागील नेमके कारण काय, कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का आणि संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का, याची चौकशी करण्याची मागणी खारेपाटातील नागरिकांकडून होत आहे. ३८ लाखांचा निधी खर्च होऊनही पाइपलाइन फुटत असेल, तर या कामाचा दर्जा तपासणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पेण तालुक्यांत वाशी विभाग व शिर्कि विभाग खारेपाटांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिषय गंभीर असून गेली अनेकवर्ष या परिसरांतील नागरीकांनी पत्रव्यवहार, बैठका, अनेक आंदोलने करुन पेण खारेपाटांतील पिण्याच्या पाण्याचा हा गंभिर प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला. ३८ कोटीचा निधी मंजूर होऊनही सदर काम नित्कृष्ठ दर्जाचे असून महिन्यातून ४ ते ५ वेळा पाईप लाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत.

या नवीन पाईप लाईन ला पाणी सोडले की पाईप लाईन फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. कालच वाशीनाका ते वाशी येथील मध्यावर पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. नविन पाईप लाईन फुटण्याला जबाबदार कोण, ठेकेदार, प्रशासन की लोकप्रतिनिधी ? सदर नविन पाईप लाईन चे काम इतके नित्कृष्ठ दर्जाचे आहे की ही पाईप लाईन जमिन खाली एक मीटर खोदुन टाकायची होती तसेच प्रत्येक जॅईड वर सिमेंट चे बॅक टाकायचे होते तसे झालेले दिसत नाही. यामुळे सदर पाईप लाईन फुटीचे सत्र आहे.

Pen Water Pipeline
Readymade Modak Ganeshotsav: गणेशोत्सवात भाविकांकडून रेडीमेड नैवेद्याला मोठी मागणी; उकडीचे मोदकासह पुरण पोळीची विशेष विक्री

सणासुदिला गणेश उत्सवा दरम्यान पेण खारेपाट भागाला पाणी वेळेेे वर मिळणार नसल्याने पाणी टंचाई ला सामोरे जावे लाागणार आहे. पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया वाशीनाका ते वाशी येथील मध्यावर पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. नविन पाईप लाईन फुटण्याला जबाबदार कोण? सदर नविन पाईप लाईनचे काम इतके नित्कृष्ठ दर्जाचे आहे की ही पाईपलाईन जमिन खाली एक मीटर खोदुन टाकायची होती. मात्र तसे झालेले दिसत नाही. सदर नवीन पाईप लाईनचे काम इस्टीमेट प्रमाणे झाले नाही.

एवढी टेक्नॉलॉजी आसताना पाईप लाईन का फुटते, याचाअर्थ ठेकेदार अनुभवी नही तसेच अधिकारी वर्गाला ठेकेदाराकडून काम करुन घेता येत नाही. येथील जमीन खारी आसल्याने प्रतेक जाॅईन्ड वर सिमेंट चे बॅक असणे आवश्यक होते ते कुठे दिसत नाही म्हणून आसे प्रकार वारंवार घडत आहेत.

- प्रितेश माळी, संघटक, खारेपाट विकास संकल्प संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news