Pen House Burglary Case: घरफोडीची तक्रार केली अन् तपासात फिर्यादीच निघाला ‘चोर’! ६.६० लाखांचे दागिने गायब

पेण तालुक्यातील आंबेराई-बेणसे येथील प्रकार; नागोठणे पोलिसांच्या तपासात तक्रारदारानेच चोरी केल्याचे निष्पन्न
Pen House Burglary Case
Pen House Burglary CasePudhari
Published on
Updated on

नागोठणे: पेण तालुक्यातील आंबेराई - बेणसे येथील फिर्यादीनेच घरच्यांना गडवून (फसवून) घरफोडीचा बनाव केला. साधारण ६ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागीने लंपास केले व त्यानेच घरफोडी झाल्याची तक्रार नागोठणे पोलिस ठाण्यात केली.

त्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अलिबाग व नागोठणे पोलीस ठाणे पथक यांनी संयुक्तीक रित्या मिळालेल्या माहीतीचे तांत्रिक विश्लेषन करून आणि गोपनिय माहीतीच्या अधारे तपास केला असता फिर्यादी यांनी खोटा बनाव करून स्वतःचे घरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घरफोडीतील सहा लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागीने हस्तगत करून फिर्यादी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी दिपक रामचंद्र भुरे, रा. आंबेराई पो. बेणसे ता. पेण यांनी नागोठणे पोलीस ठाणेत फिर्याद दिली.

४ सप्टेंबर रोजी रात्रौ १०.३० वाजता मी व माझी आई असे कृष्ण जन्माष्टमी उत्सव असल्याने आंम्ही उत्सवाकरीता गेलो होतो व उत्सव संपल्यानंतर आंम्ही घरी परत आलो असता घराचा दरवाजा उघडुन आत गेलो असता बेडरूममधील कपडे अस्ताव्यस्त दिसले व बेडरूमच्या आत असलेले लॉखडी कपाट व लाकडी कपाटाचे ड्रॉव्हर उघडे दिसले व पत्नीने लोखंडी कपाटात ठेवलेले दागीने दिसुन आले नाहीत.

Pen House Burglary Case
Forest Medicinal Plants: सह्याद्रीच्या जंगलात रानऔषधींचा खजिना! आदिवासी कुटुंबांना उत्पन्नाची नवी संधी

किचन मधील बाथरूमचा दरवाजा उघडा असुन बाथरूमच्या खिडकीच्या काचा कोणीतरी काढल्या होत्या व पोटमाळ्‌यावरील लाकडी खिडकी तोडलेली होती. दागीन्याची चोरी अज्ञात चोरटयाने केली असले बाबत फिर्याद दिल्याने नागोठणे पोलीस ठाणे येथे दाखल करणेत आला होता. सदर गुन्हयाचा तपास संदेश सानप सहायक फौजदार हे करीत होते.

व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अलिबाग येथिल पोसई सुरज पाटील व त्यांचे पथक तसेच नागोठणे पोलीस ठाणेकडील पथक यांनी संयुक्तीक रित्या मिळालेल्या माहीतीचे तांत्रिक विश्लेषन करून आणि गोपनिय माहीतीच्या अधारे तपास केला असता यांतील फिर्यादी यांनी खोटा बनाव करून स्वतःचे घरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. फिर्यादी याने स्वतःच्याच घरात आई व पत्नीचे दागिणे आर्थीक अडचणीमुळे आपणहून लपवुन ठेवले होते व चोरीस गेले बाबत तक्रार दिली होती. सदर गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागीने हे फिर्यादी यांचे ताब्यातुन हस्तगत करण्यात आले आहेत.

Pen House Burglary Case
Vasind Local Train Accident: कसारा दिशेकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

प्रवासाला बाहेर पडताना घरात दागदागिणे किंवा मोठी रोकड ठेवणे टाळा, मौल्यवाण साहीत्य बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा, बाहेरगावी जाताना विश्वासु शेजा-यांना कल्पना दया. जेणेकरून ते तुमच्या घराकडे लक्ष देतील,आपला परिसरात प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेर बसवावेत व रात्रीच्यावेळी घराचा परीसर, गॅलेरी व मुख्य दरवाजाजवळ पुरेसा प्रकाश चालु ठेवावा,परिसरात संशयीत व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत पोलीस ठाणे येथे संपर्क करावा.

त्याच प्रमाणे पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करावा,घरात काम करणारे नोकर, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, भाडेकरू यांना ठेवण्यापुर्वी त्यांची पोलीस पडताळणी करून घ्या, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news