Raigad : कुंज कुंज डोळे सुपाएवढे कान, पेणमधील बाप्पा दिसतो किती छान

पेणच्या जिवंत डोळ्यांच्या गणेशमूर्तीच्या आखणीची पंचसुत्री पिढ्यांपिढ्यांनी जोपासलेला देवत्वाच्या कलेचा वारसा
Pen Ganpati idol
मोठे आणि स्पष्ट डोळे हे या गणेशमूर्तींच्या डोळ्यांतील दुसरे वैशिष्टय आहे. डोळ्यांची रचना मोठी, गोलसर आणि स्पष्ट रेषांनी आखलेली असते. हे डोळे दूरूनही लक्ष वेधून घेतात.pudhari photo
Published on
Updated on

रायगड ः जयंत धुळप

पेणचा सुप्रसिद्ध गणपती हा त्या गणेशमुर्तीच्या डोळ्यांनी सर्वदूर ओळखला जातो. पेणच्या या मूर्तींमध्ये काही खास वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचे उठून दिसणारी वैशिष्ठ्य म्हणजे गणेशमुर्तीच्या डोळ्यांची वैशिष्ठ्यपूर्ण आखणी हे आहे. या डोळ्यांच्या आखणीचा पिढ्यांपिढ्या चालत आलेला पंचसुत्रीचा एक अनोखा देवत्वाचा वारसा आहे.

जिवंतपणा , मोठे आणि स्पष्ट डोळे,सखोल रेखाटन (डिप लायनींग),भावनात्मक अभिव्यक्ती (ईमोशनल डेप्थ), आणि हाताने रंगवलेले डोळे (हॅन्ड पेंटेड आईज) या पंचसुत्रींतून केलेली डोळ्यांची आखणी हेच पेणच्या गणेशमुर्तीची जागतिकस्तरावरील ओळख आहे.जिवंतपणा (रियालिस्टीक एक्स्प्रेशन) हे पेणच्या गणेशमुर्तीच्या डोळ्यांचे महत्वाचे आणि युनिक असे वैशिष्ठ्य आहे.

गणपतीच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा असतो, जणू काही गणपती स्वतः आपल्याकडे पाहत आहेत. त्यांच्या डोळ्यांमधून कृपा, प्रेम, आणि वात्सल्य आपल्या पर्यंत थेट पोहोचते आहे याची जाणीव होत असते. पेण हे गणेशमूर्तीकलेचं एक प्राचिन आणि पिढ्यांचा कलेचा वारसा जोपासलेले जगभरातील एकमेव ऐतिहासिक केंद्र आहे, आणि इथल्या मूर्तिकारांची पिढ्यानपिढ्यांची परंपरा डोळ्यांची सौंदर्यपूर्ण रचना जपते. त्यामुळेच पेणचा गणपती म्हटलं की त्याच्या डोळ्यांवर सगळ्यांचं लक्ष केंद्रीत होत.

  • सखोल रेखाटन (डिप लायनींग) हे डोळ्यांचे तिसरे वैशिष्ठ्य आहे. यामध्ये डोळ्याभोवती सखोल आणि काळ्या रेषांनी केलेली सजावट त्यांना अधिक प्रभावी बनवते. काजळाची आणि भुवयांची सुसंगतता अत्यंत नेमकेपणानेच असते.

  • भावनात्मक अभिव्यक्ती (ईमोशनल डेप्थ) हे डोळ्यांचे चौथे वैशिष्ठ्य आहे. यामध्ये कधी करुणा असते, कधी धीटपणा, तर कधी वात्सल्य भाव असतो. अर्थात हे प्रत्येक मूर्तिकाराच्या कुशलतेवर अवलंबून असतं.

  • हाताने रंगवलेले डोळे (हॅन्ड पेंटेड आईज) हे पाचवे आणि कुप महत्वाचे वैशिष्ठ आहे. पेणमध्ये मूळ मूर्तीकार डोळे हाताने रंगवतात, त्यामुळे प्रत्येक मूर्तीचे डोळे वेगळे आणि खास असतात. त्यात मशीनमेड मूर्तींची कृत्रिमता नसल्याने जिवंतपणा अधीक असतो.

मनातील भक्तीभाव, वात्स्यल्य तयार करण्याचे मुख्यसुत्र पुजा करावी अशी गणेशमुर्ती तयार करणे हे मुख्यसुत्र गणेशमुर्तीकाराचे असणे असे आमचे पूर्व सांगत आले आहेत. पेणमध्ये देवधर, वसईत हाटकर, गिरगांवात पाटकर अशी गणेशमुर्तीकारांची अनेक घराणी आहेत, ती पिढ्यांपिढ्या गणेशमुर्तीच्या डोळे आखणीतील पंचसुत्रीची परंपरा कायम ठेवून आहेत. डोळ्याची आखणीकरता मुर्तीकारांच्या मनातील भक्तीभाव, वात्स्यल्य, अशी भावनीक अभिव्यक्ती त्यांतून साकारत असल्याने गणपतीचे डोळे जिवंत भासतातच, हे आगळे वैशिष्ठ्य पेणच्या गणेशमुर्तींचे आहे.

श्रीकांत देवधर, पेणच्या देवधर गणेशमुर्तीकार घरांण्याच्या चौथ्या पिढीचे मुर्तीकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news