

पेण : पेण चावडी नाका येथील अमुल आईस्क्रीम पार्लर दुकानात आईस्क्रीम घेण्याकरिता गेलेल्या तरुणी सोबत आरोपी सुबोध जोशी वय ६२ या ज्येष्ठ नागरिकाने छेडछाड केल्याची घटना घडल्याने पेण शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार पेण शहरातील चावडीनाका येथे असलेल्या अमुल आईस्क्रीम पार्लरच्या दुकानात चावडी नाका जवळच राहणारी फिर्यादी तरुणी आईस्क्रीम घेण्यासाठी गेली असता आरोपी सुबोध जोशी वय ६२ रा. लोकमान्य सोसायटी यांनी तीला दुकानाचे टेरेस दाखविण्याचा बहाणा करून फिर्यादी या जिना चढत असताना फिर्यादी स्त्रीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे हातवारे करत छेडछाड केल्याने पेण पोलीस ठाण्यात बी एन एस ७४/८० २३५/२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत