Panvel | सावधान ! पनवेल परिसरात बांगलादेशींचा सर्रास वावर

खारघरमध्ये 3 बांग्लादेशी जेरबंद; बनावट निवडणूक ओळखपत्रे जप्त
Panvel"Panvel Alert | Widespread Presence of Bangladeshis in the Area"
पनवेल परिसरात बांगलादेशींचा सर्रास वावरfile
Published on
Updated on

नवीन पनवेल ः नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघर, सेक्टर- 21 मधील तपोवन सोसायटीतील घरावर छापा मारुन 2 महिला आणि 1 पुरुष अशा 3 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी चौथ्या बांग्लादेशी नागरिकाचा शोध सुरु केला आहे.

या चारही बांग्लादेशी नागरिक मागील 10 वर्षापासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे तसेच त्यातील एका जोडप्याने आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच निवडणूक ओळखपत्र बनवून घेतल्याचे उघडकीस आहे. खारघर, सेक्टर-21 मधील तपोवन सोसायटीत काही बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे आणि त्यांच्या पथकाने तपोवन सोसायटीतील संशयित घरावर छापा मारला.

यावेळी सदर घरामध्ये शकीला कादिर शेख (37), तिचा पती कादिर हबीबुल शेख (40) याच्या सोबत राहत असल्याचे तसेच रुकसाना अमिरुल घरामी (34) आणि तिचा पती अमिरुल दिनो घरामी (34) असे दोघे खारघर, सेक्टर- 13 मधील एका बिल्डींगमध्ये राहत असल्याचे आढळून आले.

त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सदर तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कागदपत्रांबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आढळून आले. मात्र, त्यातील शकीला कादिर शेख आणि तिचा पती कादिर हबीबुल शेख या दोघांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले.

संपर्क साधण्यासाठी इमो अ‍ॅप

सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या सर्व बांग्लादेशी नागरिकांकडे असलेल्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, ते इमो अ‍ॅपचा तसेच व्हॉटस्अ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉल द्वारे बांग्लादेशातील आपल्या नातेवाईकांना संपर्क साधत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच त्यांच्याकडे बांग्लादेशी नोटा सुध्दा सापडल्या आहेत. त्यामुळे सदर चारही बांग्लादेशी नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम सह कलम 14 (अ), विदेशी नागरिक अधिनियमअन्वये गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्याय आली आहे. तसेच चौथ्या बांग्लादेशी नागरिकाचा शोध सुरु केला आहे.

10 वर्षापासून भारतात वास्तव्यास

या कारवाईत अटक करण्यात आलेली शकीला कादिर शेख आणि सध्या फरार असलेला तिचा पती कादिर हबीबुल शेख या दोघांनी 10 वर्षांपूर्वी भारत बांग्लादेश सीमेवरील बेनापोल-बोनगा सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच रुकसाना घरामी आणि तिचा पती अमिरुल घरामी या दोघांनीही 2015-16 मध्ये घुसखोरीच्या मार्गाने बांग्लादेशातून भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news