Panvel Water Crisis: पनवेलच्या पाणीप्रश्नावर प्रशांत ठाकूर आक्रमक; कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाठपुरावा

मार्च २०२७ पूर्वी न्हावाशेवा टप्पा-३ योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी
Panvel Water Crisis
Panvel Water CrisisPudhari
Published on: 
Updated on: 

पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रासह आसपासच्या परिसरात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अधिक गती मिळाली आहे.

वाढती लोकसंख्या आणि विस्तारत जाणाऱ्या नागरी वसाहतींच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता अपुरी पडत असल्याने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी सातत्याने शासन आणि प्रशासनाकडे केली आहे.

Panvel Water Crisis
Tamhini Ghat Road Accidents: नागमोडी ताम्हिणी घाट की मृत्यूचा सापळा? तीन वर्षांत ९५ अपघातांत ३९ जणांचा मृत्यू, १७५ जखमी

याच अनुषंगाने रायगडचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या पाणीप्रश्नावर ठोस भूमिका मांडत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित प्रश्नांचा जाब विचारला.

Panvel Water Crisis
Mumbai Crime News: मोजमापाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; फेरीवाल्याविरुद्ध पोक्सोचा गुन्हा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारी न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजना सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करून मार्च २०२७ पूर्वी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यांनी मांडलेल्या मागण्या आणि सूचनांनुसार आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.

पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असून, लोकसंख्येच्या वाढीसोबतच पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, उलवे तसेच सिडकोच्या विविध वसाहतींमध्ये पाणीपुरवठ्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे.

मात्र, उपलब्ध जलस्रोत आणि वाढती मागणी यामध्ये समतोल राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता भविष्यातील लोकसंख्या आणि नागरी विकासाचा विचार करून पाणीपुरवठ्याचे सक्षम नियोजन करावे, अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने मांडली आहे.

या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण, तुकाराम सरक यांच्यासह नगरविकास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधून योजनेवर देखरेख

पनवेलच्या पाणीप्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वॉर रूममध्ये करण्यात आला आहे.

त्यामुळे योजनेच्या प्रगतीवर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून लक्ष ठेवले जात आहे. यापूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत या योजनेसंदर्भात दोन वेळा बैठका झाल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीतही योजनेला विशेष प्राधान्य देऊन कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अडचणी दूर करण्याची ग्वाही

पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक पातळीवर उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पुढाकार घेतील, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

न्हावाशेवा टप्पा-३ योजनेला सर्वोच्च प्राधान्य

मंत्रालयातील बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारी ही योजना पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

त्यामुळे या योजनेच्या कामातील अडथळे तातडीने दूर करून कामाला गती द्यावी आणि मार्च २०२७ पूर्वी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. योजनेच्या निर्धारित कालमर्यादेत पूर्ततेसाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सूचित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.