

पनवेल : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकून पडलेल्या पनवेलच्या ३४ पर्यटकांपैकी ३१ पर्यटक गुरुवारी (दि.२४) रात्री सुखरूपरित्या मुंबई विमानतळावर परतले. त्यांचे आगमन होताच नातेवाईक आणि प्रशासनाच्या वतीने त्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले.
या पर्यटकांचा निसर्ग पर्यटन या संस्थेच्या माध्यमातून काश्मीर दौरा आयोजित करण्यात आला होता. प्रवाशांमध्ये विविध वयोगटांतील महिला, पुरुष आणि काही वृद्ध नागरिकांचाही समावेश होता. पहलगाम परिसरात अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण भाग बंद केला होता, परिणामी हे पर्यटक जवळपास तीन दिवस तिथेच अडकून पडले होते. परत आलेल्या ३१ पर्यटकांमध्ये सर्वजण सुखरूप असून त्यांच्या चेहऱ्यावर परत येण्याचा आनंद आणि थोडीशी भीती स्पष्टपणे दिसून येत होती. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या नातेवाईकांच्या भावना अनावर झाल्या. पुष्पगुच्छ, स्वागत घोषणा आणि आलिंगनांतून त्या क्षणाचे औत्सुक्य अधोरेखित झाले.
दरम्यान, या सहलीतील दोन पर्यटक सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील व त्यांचे चिरंजीव अद्याप श्रीनगरमध्ये आहेत. सुबोध पाटील किरकोळ जखमी झाले असल्याने सुबोध पाटील यांच्यावर सध्या श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रशासनाकडून त्यांच्या परतीसाठीही आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.
दहशतवादी हल्लानंतर पहलगाम अडकलेल्या पनवेल मधील ३४ पर्यटकांपैकी ३१ पर्यटक गुरूवारी (दि.२४) आठ वाजता मुंबई एअरपोर्ट येथे सुखरूप आले आहेत. तर जखमी असलेले सुबोध पाटील यांच्यावर श्रीनगर येथे उपचार सुरू असल्याने सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी माणिक पाटील व त्यांचे चिरंजीव अद्याप श्रीनगरमध्येच आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.
१. संकेत वत्सराज
२. सिद्धी वत्सराज
३. वासुदेव वत्सराज
४. रोहिणी वत्सराज
५. पुष्कर लिमये
६. स्नेहल लिमये
७. माधुरी लिमये
८. सोनाली गुरव
९. मीता पुळेकर
१०. प्रफुल्ल शिर्के
११. अमित रानडे
१२. जुई रानडे
१३. आरोही रानडे
१४. उषा देसले
१५. केशव रिधुरकर
१६. कल्पना रिधुरकर
१७. संतोष कवठेकर
१८. स्वाती कवठेकर
१९. कविता सोनटक्के
२०. वर्षा जोशी
२१. सुनील पाटील
२२. नंदा पाटील
२३. नंदा पाटील
२४. ओंकार पाटील
२५. मनस्वी बहिरा
२६. सानवी बहिरा
२७. शंकर पाटील
२८. पुष्पलता पाटील
२९. अशोक म्हात्रे
३०. साधना म्हात्रे
३१. प्रिया ओक