Panvel | आयफोन घेण्यास वडिलांनी नकार दिल्याने 18 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

परिसरात एकच खळबळ
Panvel
आयफोन घेण्यास वडिलांनी नकार दिल्याने 18 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

पनवेल : महागडा आयफोन घेण्यास वडिलांनी नकार दिला म्हणून कामोठे वसाहतीमध्ये राहणार्‍या 18 वर्षीय मुलाने स्वतःला संपावल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. मुलाने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

18 वर्षीय युवकाचे नाव संजय रणजित वर्मा असे आहे. संजयला आयफोन घ्यायचा होता. आणि त्याची किंमत दीड लाख रुपये होती. आयफोन बाबत संजयने वडिलांकडे आयफोन घेऊन देण्याची मागणी केली होती. आयफोन ची मागणी करून देखील वडील आयफोन घेऊन देत नसल्याचे रागातून संजय ने टोकाचे पाऊल उचलले. संजय ने स्वतःला संपवण्याच्या निर्णय घेत, राहत्या घरात साडीने गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. संजय ने गळफास घेतल्याचे कुटूंबाच्या निदर्शनास आल्या नंतर, कुटूंबावर दुःखाचे सावट पसरले. या घटनेची माहिती कामोठे पोलिसांना मिळाल्या नंतर पोलिसांनी अधिक माहिती घेतल्या नंतर आयफोन घेऊन न दिल्याने संजय ने असे केल्याने समजले.

दरम्यान, या प्रकारामुळे कामोठे परिसरात एकच खळबळ माजली आहे. झालेल्या प्रकाराने पोलीस यंत्रणाही हादरुन गेली आहे. कामोठे पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news