October Heatwave Maharashtra : 'ऑक्टोबर हिट'मुळे उसाच्या रसाला मागणी

थंडावा मिळवण्यासाठी रसवंतीगृहांवर गर्दी; उकाड्यामुळे पनवेलकर हैराण
October Heatwave Maharashtra
October Heatwave Maharashtrapudhari photo
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी : राजेश डांगळे

पावसाळा संपताच ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला असून, वाढत्या उकाड्यामुळे पनवेलकर हैराण झाले आहेत. दिवसभर जाणवणारे कडक ऊन आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचा कल थंड पेयांकडे वाढला असून, शहरातील रसवंतीगृहांमध्ये उसाचा रस पिण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ काहीशी कमी होत आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच रिक्षाचालकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिक थंड पेये आणि पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत.

October Heatwave Maharashtra
MPSC Old Documents Disposal : एमपीएससीची जुनी कागदपत्रे विल्हेवाटीला स्थगिती

पनवेल, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी परिसरातील रसवंतीगृहांमध्ये उसाचा रस पिण्यासाठी नागरिक थांबत असल्याचे दिसून येते. उसाचा ताजा रस, त्यात लिंबू आणि आले घालून तयार केलेला रस अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. उन्हातून चालत आल्यानंतर रसाचा ग्लास पिऊन थोडा वेळ सावलीत विसावा घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. त्यामुळे रसविक्रेत्यांकडे ग्राहकांची वर्दळ वाढताना दिसत आहे.

October Heatwave Maharashtra
Rangumata Devi Temple : तळोशी येथील नवसाला पावणारी देवी 'श्री रंगुमाता'

दरम्यान, नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना शक्यतो डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरावी, पुरेसे पाणी प्यावे आणि दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक फिरणे टाळावे. रस पिताना स्वच्छता राखणाऱ्या विक्रेत्यांची निवड करावी, असे आवाहनही महत्त्वाचे ठरत आहे.ऑक्टोबर हिटचा उकाडा कधी कमी होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला असून, तापदायक वातावरणातून दिलासा मिळण्याची प्रतीक्षा पनवेलकरांना आहे.

थंड पेयांना पसंती

ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यानंतर तापमानात वाढ जाणवू लागते. यंदाही उकाड्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करताना त्रास होत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हात फिरताना थकवा जाणवत असल्याने नागरिक सावलीचा आधार घेत आहेत. उसाच्या रसासह ताक, लिंबूपाणी आणि इतर थंड पेयांकडेही ग्राहकांचा ओढा वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news