Panvel Murder | टी-शर्टच्या मदतीने खुनातील आरोपी जाळ्यात

मद्य प्राशनावरुन युवकाची बेल्टने गळा आवळून हत्त्या; पनवेलमधील अज्ञात युवकाच्या खुनाचे गुढ उकलले
Panvel Murder
टी-शर्टच्या मदतीने खुनातील आरोपी जाळ्यात Pudhari Photo
Published on
Updated on

पनवेल ः पनवेल शहरात सापडलेल्या अज्ञात मृतदेहाच्या मारेकर्‍याचा तपास लावण्यात पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाला यश आले आहे. पनवेल शहरातील सीसीटीव्ही आणि अंगात घातलेल्या टीशर्टच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.

या प्रकरणी 27 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांमध्ये दारु पित असताना वाद होवून आजूबाजूला पडलेल्या बेल्टच्या आधारे गळा आवळून व्यक्तीला ठार मारले आहे. जो मयत झाला आहे त्याचीही अद्याप ओळख पटलेली नाही.

धीरज राजू शर्मा वय 27 राहणार कोळीवाडा असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. धीरज शर्मा यांने दारु पिण्यावरून झालेल्या वादातून त्या अज्ञात इसमाची हत्या केली होती. 13 सप्टेंबर रोजी पनवेल शहरातील ओरियन मॉलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत एक अज्ञात इसमाची बॉडी मृत अवस्थेमध्ये पनवेल पोलिसांना मिळून आली होती. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली होती, ही नोंद केल्या नंतर हा अज्ञात इसम कोण आणि त्याची हत्या कोणी केली असावी यांचा शोध घेणे पोलिसांसाठी किचकट विषय बनला होता. कारण मृतदेहाची ओळख देखील पटत नव्हती. मात्र या गुन्ह्याचा तपास पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांनी सुरू केल्या नंतर तपासला वेग लागला.

सर्वप्रथम हा मृतदेह असलेल्या व्यक्तीचा, सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाला सुरवात केली, त्यासाठी पनवेल परिसरातील रेल्वे स्टेशन, पनवेल एसटी स्टँड तसेच अन्य सीसीटीव्ही तपासायला सुरवात केली, त्या तपासत मृतदेहाने घातलेला टीशर्टचा शोध पोलिसांना लागला पोलिसांनी या टीशर्टधारी इसमाचा शोध सुरू केला. त्या वेळी एक अज्ञात इसम हा मृतदेहाने घातलेल्या टीशर्ट सोबत फिरताना दिसून आला. तो अज्ञात इसम शहरातील कोळीवाड्यात मिळून आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news