Prakash Mhatre suspension: टाळ्यांच्या आवाजाने महापालिका सभेत रणकंदन; नगरसेवक प्रकाश म्हात्रेंचे निलंबन

महापौरांच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीचा सभात्याग; सुरक्षारक्षकांना पाचारण
Prakash Mhatre suspension
Prakash Mhatre suspensionPudhari
Published on: 
Updated on: 

पनवेल: प्रेक्षक गॅलरीतून उमटलेल्या टाळ्यांचा आवाज थेट महापालिकेच्या सभागृहातील राजकीय संघर्षाचे कारण ठरला. नागरिकांच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या शेकापचे नगरसेवक प्रकाश म्हात्रे यांच्यावर महापौर नितीन पाटील यांनी निलंबनाची कारवाई केल्याने मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मोठा गोंधळ उडाला.

म्हात्रे यांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला.

Prakash Mhatre suspension
Poladpur Paddy Harvest: शेतकऱ्यांची सोन्याची पेटी; भाताच्या राशीत दडलेली वर्षभराच्या कष्टांची कहाणी...

आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरू असलेल्या सभेत गव्हाण आणि वडघर जिल्हा परिषद गट महापालिकेत समाविष्ट करण्याचा विषय चर्चेला आला होता. या चर्चेदरम्यान नगरसेविका लीना गरड यांनी शहरातील अपुऱ्या नागरी सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मांडणीला गॅलरीत बसलेल्या काही नागरिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Prakash Mhatre suspension
Town Hall Gymkhana: फोर्टमधील टाऊनहॉल जिमखान्याचा कायापालट; ४४.८७ कोटींच्या खर्चातून सहा मजली इमारत उभारणार

या प्रकारामुळे सभागृहातील वातावरण अचानक बदलले. टाळ्या वाजवणाऱ्या नागरिकांना बाहेर जाण्यास सांगण्याच्या सूचना महापौरांनी सुरक्षारक्षकांना दिल्या. याच वेळी प्रकाश म्हात्रे यांनी हस्तक्षेप करीत गॅलरीतील नागरिकांचा लीना गरड यांच्या राजकीय भूमिकेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

ते अन्य कारणासाठी नाट्यगृहात आले असल्याने त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, या हस्तक्षेपामुळे महापौर आणि म्हात्रे यांच्यात मतभेद तीव्र झाले. महापौरांनी थेट म्हात्रे यांच्या निलंबनाची घोषणा केली.

या कारवाईने विरोधक आक्रमक झाले. केतन भगत आणि लतिफ शेख यांनी महापौरांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तरीही निर्णयावर ठाम राहत महापौरांनी म्हात्रे यांनी सभागृह न सोडल्यास पुढील तीन सभांसाठी निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सुरक्षारक्षकांना त्यांना बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले.

या प्रकारामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक संघर्ष अधिकच वाढला. लोकप्रतिनिधीला आपली बाजू मांडू न देता कारवाई करण्यात येत असल्याचा आक्षेप घेत महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नागरिकांच्या टाळ्यांपासून सुरू झालेला हा वाद अखेर महापालिकेतील सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्षाचे रूप घेऊन संपला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.