PMC Clerks Terminated | पनवेल महानगरपालिकेची शिस्तभंग कारवाई; 6 लिपिक सेवेतून कमी

आवश्यक तांत्रिक अटींची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई केल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण
Panvel Municipal Corporation Disciplinary Action
Panvel Municipal Corporation Disciplinary Action Pudhari
Published on
Updated on

Panvel Municipal Corporation Disciplinary Action

पनवेल : पनवेल महानगरपालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई करत सहा लिपिक कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्यक तांत्रिक अटींची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमधील लिपिक पदावरील कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत घेताना काही तांत्रिक अटी अनिवार्य करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मराठी व इंग्रजी टायपिंगचे प्रमाणपत्र सादर करणे ही महत्त्वाची अट होती. संबंधित कर्मचाऱ्यांना ही अट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून मुदत देण्यात आली होती. मात्र, सहा कर्मचाऱ्यांनी निर्धारित कालावधीत आवश्यक पात्रता सादर न केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Panvel Municipal Corporation Disciplinary Action
Panvel Municipal Election Results : पनवेलच्या राजकारणात अनपेक्षित वळण

या निर्णयानंतर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासन अधिक कठोर भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. भविष्यातही नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उपायुक्त तथा आस्थापना प्रमुख कैलास गावडे यांनी सांगितले की, समाविष्ट ग्रामपंचायतींमधील सहा कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन मराठी व इंग्रजी टायपिंगची अट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यांनी आवश्यक तांत्रिक पूर्तता न केल्याने त्यांना सेवेतून कमी करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news