Raigad News : पनवेल,खारघर परिसरातील डान्सबारवर पोलिसांची नजर

पहाटेपपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती असतानाही निर्बंध,व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता
Illegal dance bars
पनवेल,खारघर परिसरातील डान्सबारवर पोलिसांची नजरpudhari photo
Published on
Updated on

खारघऱ ः महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर क्लब व तत्सम आस्थापनांना पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देणारा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र तरीही नवी मुंबईतील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाची अंमलबजावणी न करता नाहक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप क्लब चालकांकडून करण्यात येत आहे.

नाताळ सणाला ख्रिश्चन धर्मात फार महत्व आहे. त्यामुळे हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी ख्रिश्चन समाज संध्याकाळी बाहेर पडतो. आपला परिवार आणि नातेवाईक यांच्यासोबत हर्ष उल्हासाने साजरा करतात. मात्र हा सण साजरा करण्यासाठी क्लब चालकांना दिनांक 24 , 25 डिसेंबर व 31 डिसेंबर रोजी रात्री 10:30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी राज्य शासनाने दिली असताना ही, एपीएमसी हद्दीतील पोलीस अधिकारी या क्लब चालकांना नाहक त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

Illegal dance bars
Khopoli murder case : आ. थोरवे, घारे वादातूनच खोपोलीत हत्या

काही पोलीस अधिकाऱ्यांनी “नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पहाटे 5 वाजेपर्यंत कोणतेही लेखी आदेश किंवा नोटिफिकेशन प्राप्त झालेले नाही” तसेच “आमच्याकडे मॅन पावर उपलब्ध नाही” असे पोलिसांकडून स्पष्टपणे सांगितल्याचा दावा क्लब चालकांनी केला आहे. विशेष म्हणजे, याच वेळी ऑर्केस्ट्रा बारसाठी पहाटेपर्यंत चालू आहे. क्लब चालकांवर मात्र निर्बंध लादले जात असल्याने दुजाभाव होत असल्याचा आरोप होत आहे.

Illegal dance bars
Jawhar Nagar Parishad politics : जव्हारच्या उपनगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात

आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे मागणी

या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तात्काळ स्पष्ट नोटिफिकेशन काढून सर्व पोलीस ठाण्यांना शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी क्लब चालक व संघटनांकडून करण्यात येत आहे. अन्यथा क्लब चालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान,बार मालकांच्या या समस्येवर पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

गुंतवणुकीवर पाणी फिरण्याची भीती

काही ठिकाणी नियम नसल्याचे सांगत क्लब चालकांकडून ‌‘लक्ष्मी दर्शन‌’ ची अप्रत्यक्ष अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचीही चर्चा व्यावसायिक वर्तुळात आहे. नाताळ व ख्रिसमस सणासाठी अनेक क्लब चालकांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन, कलाकारांचे बुकिंग, सजावट व तांत्रिक व्यवस्था यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास या सर्व गुंतवणुकीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news