Panvel Accident: ट्रेलरच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्‍यू; जेएनपीटी मार्गावरील घटना

चालकाविरोधात गुन्हा दाखल
Accident
AccidentPudhari file photo
Published on
Updated on

पनवेल: भरधाव ट्रेलरच्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सख्ख्या बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पनवेल–जेएनपीटी मार्गावर घडली. प्राशु भारद्वाज सिंग (१८) आणि त्यांची बहीण वंशिका भारद्वाज सिंग (२०) दोघेही रा. इंडियाबुल्स, पनवेल) अशी दोघांची नावे आहेत.

या प्रकरणी ट्रेलर चालक राजीव कुमार विजयशंकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident
High Court Order: सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात असे गृहीत धरता येणार नाही; अपघात भरपाई प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे बहिण-भाऊ जेएनपीटीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणार्‍या ट्रेलरने त्‍यांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Accident
Maharashtra Politics: फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, शिंदे यांचा पत्ता कट होणार; संजय राऊत यांचे भाकीत

एका क्षणात बहिण-भावाचे आयुष्य संपुष्टात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली असून, भरधाव अवजड वाहनांमुळे वाढणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांकडून भरधाव अवजड वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news