Panvel | विमानाच्या आवाजाने कानाला दडे बसण्याची भीती; ग्रामस्थांकडून पुनर्वसनाची मागणी

पनवेल नजीक विमानतळावर सिग्नल तपासणीची चाचणी
Panvel
विमानाच्या आवाजाने कानाला दडे बसण्याची भीती; ग्रामस्थांकडून पुनर्वसनाची मागणीpudhari photo
Published on
Updated on

पनवेल : पनवेल नजीक सुरू असलेल्या विमानतळावर सिग्नल तपासणीची चाचणी झाली. या चाचणीसाठी आलेल्या लहान विमानाचा आवाज हा आजूबाजूच्या गावात पोहोचला आणि त्या पहिल्याच विमानाच्या आवाजाने नागरिक थोड्या वेळ का होईना त्रस्त झाले. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून रोज उडणा-या विमानांची संख्या जास्त असणार आहे. त्यांच्या आवाजामुळे ग्रामस्थांच्या कानाला दडे बसणार आहेत. त्यामुळे गावांचे पुनर्वसन होणे अपेक्षित असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

एक विमान पाच आवाज

एका विमान पाच प्रकारचे आवाज काढते. टेकऑफ करण्यापूर्वी तुम्हाला ऐकू येणारा पहिला आवाज हा एक मोठा आवाज असतो. विमान टॅक्सी, निर्गमन करण्यापूर्वी किंवा आगमनानंतर, विमान एक विचित्र आवाज येतो. विमान उड्डाण करण्यापूर्वी आणि हवेत गेल्यानंतर, तुम्हाला चक्राकार आवाज ऐकू येतो. विमान अंतिम उतरण्यास सुरुवात करते, साधारणपणे २,००० फूट, पंखाखालील एक फडफड उघडतो आणि लँडिंग गियर खाली येतो. हे अनेकदा एक मोठा आवाज येतो. जेव्हा विमान उतरते तेव्हा आपल्याला ब्रेक्सचा जोरात आवाज ऐकू येतो.

पहिल्याच विमानाच्या आवाजाने त्रस्त

याबाबत नोव्हेंबर-फेब्रुवारी २००९ ला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात निरिक्षण करण्यात आले. नवी मुंबई (भारत) विमानतळाच्या आजूबाजूच्या निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि सायलेन्स झोनच्या सर्व ठिकाणी २४ तास ध्वनी निरीक्षण करण्यात आले. परिणामी ध्वनी प्रदूषण विमानतळ त्याच्या बहुतांश भागात पसरलेला होते. आवाजाच्या अभ्यासात टेकऑफपूर्वी ६०-६५ डेसिबल पातळी नोंदवली गेली; फ्लाइट दरम्यान ८०-८५ डीबीए; आणि लँडिंग दरम्यान ७५-८० डेसिबल विमानाच्या इंजिनच्या बाहेरील (टेकऑफच्या वेळी सुमारे १४० डेसिबल) आणि इतर विमानांच्या स्थितींमध्ये आवाजाची पातळी जास्त किंवा कमी असू शकते. पनवेलनजीक सुरू असलेल्या विमानतळावर सिग्नल ची चाचणी करण्यात आली. येथून मार्च २०२५ दरम्यान पहिले विमान उडणार असल्याचे सांगितले जात आहे. पण सिग्नल चाचणीत पहिल्याच विमानाचा आवाजाने आजूबाजूच्या गावातील नागरिक त्रस्त झाले. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज मोठ्या प्रमाणात विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होणार आहे. तेव्हा ती विमाने देखील चाचणीसाठी आणलेल्या विमानापेक्षा मोठी असणार आणि त्यांचा आवाजही मोठाच असणार आहे. याचा त्रास आजूबाजूची जी गावे आहेत त्यांना जास्त होणार आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आज- ारी नागरिकांना याचा त्रास होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news