पनवेल : कामोठ्यात हॉकी स्टिकने युवकावर प्राणघातक हल्ला! मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

पनवेल : कामोठ्यात हॉकी स्टिकने युवकावर प्राणघातक हल्ला! मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
Published on
Updated on

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी एका युवकाला हॉकी स्टिक आणि अन्य साहित्याच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये आज (दि. १५) घडली. या हल्ल्यात जखमी युवकला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णलयात नेण्यात आले. कामोठे वसाहतीमधील या हल्ल्याने वसाहतीमधील टोळक्याची गुंडागिरी पुन्हा चर्चेत आली आहे. मारहाण दुपारी झाल्या नंतर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र अद्याप पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप युवकाच्या कुटुंबियांनी केला आहे. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

यश संजय भोसले असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. यश भोसले हा सेक्टर ३६ मधील रहिवाशी आहे. आज (दि. १५) दुपारी मित्रांना भेटण्यासाठी तो सोसायटी खाली आला होता. त्या वेळेस, यश आणि त्याचे अन्य मित्र सोसायटीच्या गेट वर उभे होते. यावेळी १५ ते २० जणांच्या टोळक्यानी एकत्र येऊन यशवर प्राण घातक हल्ला चढवत त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान टोळक्याच्या जमावाने मारहाण करताना हॉकी स्टिक तसेच अन्य साहित्याचा वापर केल्याचा आरोप यशने केला आहे.

ही सर्व घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. ही मारहाण एवढी भयानक होती की, यामध्ये यशचा जीव देखील गेला असता,. यश सोसायटीमध्ये घुसल्याने मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार एखाद्या सिनेमातील गॅंगवॉर सारखा दिसून येत आला. अगदी मारहाण करताना हॉकी स्टिक सारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर केला गेला आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद पोलिसांनी केली नसल्याचा आरोप यश भोसलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या मारहाणीत यशचा जीव गेला असता असा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. ही घटना पाहून टोळी गुंडगिरी कामोठ्यात फोफावताना दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news