Panvel Assembly Election | पनवेल मतदारसंघात दुरंगी सामना

प्रशांत ठाकूर, बाळाराम पाटील, लीना गरड, कांती कडू यांच्यासह तेरा उमेदवार रिंगणात
Panvel Assembly Election | पनवेल मतदारसंघात दुरंगी सामना
Published on: 
Updated on: 

पनवेल | पनवेल विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहणार आहे. या मतदारसंघात भाजपचे रायगडमध्ये प्रभावी नेते प्रशांत ठाकूर हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीकडून शेकापचे बाळाराम पाटील रिंगणात आहेत. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीना गरड तर अपक्ष कांती कडू यांच्यासह तेरा उमेदवार रिंगणात आहेत.

पनवेल हा साडे पाच लाखाहून जास्त मतदार असलेला मोठा मतदारसंघ आहे. प्रशांत ठाकूर हे या मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. 2009 ला पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती आणि विजयी सुद्धा झाले होते. शेकापचा बालेकिल्ला त्यावेळी काँग्रेसने काबीज केला होता. त्यांनतर 2014ला प्रश्न ठाकूर भाजपमध्ये गेले आणि त्यांनतर विजयी सुद्धा झाले. आणि भाजपचे सरकार आले. 2019 ला ही ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यामुळे तीनही टर्म सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी पूर्ण केल्या आहेत. आता ते भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. महाविकास आधाडीचे उमेदवार म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीना गरड रिंगणात असल्या तरी शेकापचाही उमेदवार रिंगणात असल्याने विरोधी मतांचे विभाजन होणार हे निश्चित झाले आहे. याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. पावेल विधानसभेत पनवेल शहर, नवीन पनवेल. खांदा कॉलोनी, कामोठे, खारघर हा भाग येतो. बहुतांश स्थलांतरित मतदार येथे आहेत.

नव्या हौसिंग सोसायट्यांमुळे मुंबईतून उपनगरात गेलेल्या मतदारांचा भरणा येथे पाहायला मिळतो. त्यामुळे सुशिक्षित आणि संयमी उमेदवाराला येथे अधिक पाठिंबा मिळतो. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला हा मतदारसंघ सध्या हायटेक होताना दिसत आहे. नव्याने होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तिसर्‍या मुंबईचे प्रवेशद्वार होऊ पाहणार्‍या या मतदारसंघात विकास प्रकल्पांची चलती आहे. याचा फायदा सत्तारूढ आमदारांना होण्याची शक्यता या अधिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news