Panvel Accident | पनवेलला ट्रकच्या धडकेत टोलवसुली कर्मचारी ठार

घटनेनंतर धडक देणारा ट्रकचालक फरार
Panvel Accident
पनवेलला ट्रकच्या धडकेत टोलवसुली कर्मचारी ठार Pudhari File Photo
Published on
Updated on

पनवेल | रोडपाली येथील फुडलँड कंपनीसमोरील उड्डाणपुलावरुन भरधाव येणा-या ट्रकने शनिवारी सायंकाळी 32 वर्षीय टोल वसूल करणार्‍या कर्मचार्‍याला चिरडले. दोन वाहनांमध्ये हा कर्मचारी चिरडला गेला.

घटनेनंतर धडक देणारा ट्रकचालक फरार झाला होता. ट्रकचालक कळंबोली पोलीस ठाण्यात हजर झाला. संदीप मिश्रा असे या मृत कर्मचा-याचे नाव आहे. भवधाव वेगाने ट्रक चालविल्याबद्दल कळंबोली पोलीस कारवाई करत आहेत.

रोडपाली येथील फुडलँड कंपनीसमोरील उड्डाणपुलावर सायंकाळच्या सूमारास नेहमी वाहतूक कोंडी असते. तळोजा औद्योगिक वसाहतीमधून सायंकाळच्या सूमारास कंपन्यांमधून एकाचवेळी सूटणा-या वाहनांमुळे ही कोंडी होते. या पुलावरुन विरुद्ध दिशेने सुद्धा वाहने पळविली जातात. नवी मुंबई वाहतूक पोलीसांच्या मागणीनंतर पनवेलमधील वाहतूक कोंडीवर पोलीसांना सहकार्यासाठी पालिकेने वार्डनची नेमणूक वाहतूक नियमनासाठी केली आहे. रोडपाली चौकात हे वार्डनही पोलीसांकडून तैनात केले असतात.

संदीप मिश्रा हे एका अवजड वाहनाकडील टोलची पावती तपासत असताना फुडलॅण्ड कंपनीसमोरील उड्डाणपुलावरुन आलेल्या ट्रकने संदीपला धडक दिली. या धडकेमध्ये संदीप दोन्ही ट्रकच्या मधोमध चिरडून घटनास्थळीच तो ठार झाला.

टोलच्या इतर कर्मचा-यांनी संदीपला महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला होता. ट्रकचालक बिलाल अहमद हजरत अली याला पोलीसांनी ताब्यात घेतले.या दुर्घटनेमुळे कर्मचारी वर्गात संतापासह भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news