Panvel | नैना प्रकल्पबाधित शेतकरी समितीची लोकआयुक्तांकडे धाव

NAINA Project in Panvel | निवृत्त न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांच्याकडे तक्रार दाखल
NAINA Project in Panvel
नैना प्रकल्पबाधित शेतकरी समितीची लोकआयुक्तांकडे धावPudhari Photo
Published on
Updated on

पनवेल : नैना प्रकल्प बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नैना सिडको प्रकल्पच्या विरोधात व पनवेलच्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे लोकआयुक्तांकडे धाव घेतली आहे.

पनवेलच्या 23 गावांतील भूमीपुत्र असलेल्या शेतकर्‍यांवर होणारा अन्याय दूर झाला नसून सिडको नैना प्रकल्पाच्या विरोधात आगरी सेना मुंबई अध्यक्ष जयेंद्र खुणे यांच्या नेतृत्वाखाली व नैना प्रकल्प बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष वामन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नैना सिडको प्रकल्पच्या विरोधात व पनवेलच्या शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्ताकडे धाव घेतली आहे.

NAINA Project in Panvel
Nashik | जिल्हा समाजकल्याण अधिकारीपदी हर्षदा बडगुजर

नवी मुंबई विमानतळ होत असल्याने विकासाच्या नावाखाली पनवेल मधील 23 गावातील मूळ भूमिपुत्र असलेल्या ग्रामस्थ्यांच्या शेत जमिनीवर विविध प्रकारची आरक्षणे टाकून शेतजमिनी हस्तांतरित करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे कुटील कटकारस्थान हे काही लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक व सिडको - नैना प्रकल्प अधिकारी करीत असल्याचे निवृत्त न्यायमूर्ती व्हि.एम. कानडे (लोकआयुक्त, महाराष्ट्र राज्य) यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकआयुक्त कार्यालयाच्या दालनात बुधवारी दुपारी सुनावणीच्या दरम्यान रीतसर चर्चा विनिमय करून तक्रार दाखल केली.

शेतकर्‍यांवर दादागिरी?

शेतकर्‍यांनी सिडको नैनाला आपल्या मालकीच्या शेतजमिनी विकल्या नसताना देखील कोणाच्या तरी राजकीय व्यक्तींच्या सांगण्यावरून सिडको नैना अधिकारी व कर्मचारी शेतकर्‍यांच्या गावात व जमिनीवर येऊन दादागिरी, अरेरावी तसेच जबरदस्तीने मोजमाप करायला येत असल्याबाबत चर्चा करण्यात आली.

NAINA Project in Panvel
शिंदे गटाला हवा नाशिक शहरातील मतदारसंघ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news