रेल्वे संरक्षण दलाचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'; ८६१ मुलांचे पालकांसोबत पुन:र्मिलन
रोहे : रेल्वे संरक्षण दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच ते "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत हरवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी इतर भागधारकांसोबत काम करत आहे. यावर्षी १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने एकूण ८६१ मुलांना (५८९ मुले आणि २७२ मुली) त्यांच्या कुटुंबियांसोबत पुन:र्मिलनास मदत केली आहे.
सुटका करण्यात आलेल्या मुलांचे महिन्यानिहाय तपशील पहाता एप्रिल मध्ये २९ मुले आणि २७ मुली- एकूण मुलांची संख्या ५६, मे मध्ये ६१ मुले आणि ३२ मुली एकूण मुलांची संख्या ९३, जून मध्ये ५५ मुले आणि ४० मुली एकूण मुलांची संख्या ९५, जुलै मध्ये १३७ मुले आणि ६५ मुली एकूण मुलांची संख्या २०२,ऑगस्ट मध्ये ९७ मुले आणि ४४ मुली एकूण मुलांची संख्या १४१, सप्टेंबर मध्ये १२५ मुले आणि ३५ मुली एकूण मुलांची संख्या १६०, ऑक्टोबर मध्ये ८५ मुले आणि २९ मुली एकूण मुलांची संख्या ११४ असे एकूण मुले ५८९,एकूण मुली २७२ एकत्रीत एकूण मुलांची संख्या ८६१ एवढी आहे.
भांडण, काही कौटुंबिक समस्यांमुळे, चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.

