Online payments impact on cash : ऑनलाईनमुळे बाजारातील ‘रोकड गल्ला’ गायब

किरकोळ दुकानदारांना सुट्ट्या पैशांचेच झाले वांदे , फसवणुकीचे प्रकार मात्र वाढले
Online payments impact on cash
ऑनलाईनमुळे बाजारातील ‘रोकड गल्ला’ गायबpudhari photo
Published on
Updated on

अलिबाग : अतुल गुळवणी

देशात सध्या ऑनलाईन पेमेेंटचा जमाना आलायं.बघावं तिकडे जो तो खिशात रोकड बाळगतच नाही,पण मोबाईलद्वारे ऑनलाईन पेमेंट करुन कोणतेही बिल भागविले जाते.याचा फायदा सर्वांनाच होत असला तरी आता बाजारपेठांमध्ये नवीनच गंभीरच समस्या आवासून उभी ठाकली आहे ती म्हणजे बाजारपेठेतील व्यावसायिकांकडून रोख रोकडच आता गायब झाली आहे.

अगदी सुट्ट्या पैशांचाही वांदा झाल्याने जादा व्याजाने सुट्टे पैसे घेण्याची वेळ व्यापार्‍यांवर आलेली आहे.त्याचबरोबर खोटी आमिषे दाखवून ऑनलाईन पैसे हडप करण्याचे प्रमाण मात्र वाढल्याचे जाणवत आहे.

किरकोळ बाजारातील व्यवहार देखील ऑनलाईन पेमेंटद्वारेच दिले जाते.अगदी सकाळच्यावेळी बाजारपेठेत साधी भाजी घेतानाही ग्राहक रोख पैशांऐवजी विक्रेत्याला ऑनलाईन पैसे देताना दिसत आहे.विक्रेताही स्कॅनरद्वारे पैसे वसूल करताना दिसत आहे.पण यामुळे बाजारातील रोकड मात्र गायब झाली आहे.

बहुतांशी व्यवहार हे थेट ऑनलाईनच होताना दिसत असल्याने विक्रेत्यांकडे रोख रक्कम नसल्याचे जाणवत आहे.याचा परिणाम अनेक व्यवहारांवर होऊ लागलेला आहे.सध्या बाजारात सहज जरी चक्कर मारली तरी प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागात चिल्लर पैसे देणे अशा स्पष्ट सुचना देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे अनेकदा सुट्टे पैसे नसले तर त्याबदल्यात नवीन वस्तू घेऊन बिल भागवावे लागत आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार

2024-25 मध्ये, डिजिटल आर्थिक फसवणुकीत गुंतलेली एकूण रक्कम 4,245 कोटींवर पोहोचली आहे, ज्यात 2.4 दशलक्ष घटनांचा समावेश आहे. एका अहवालानुसार, 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत, सायबर घोटाळ्यांमुळे सुमारे 11,333 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे, विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये, जिथे ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात.

रायगडातही सायबरचे गुन्हे

सायबर गुन्ह्याच्या घटना रायगडातही मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी रायगड पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात आतापर्यंङत 7 गुन्हे दाखल झालेले आहेत.त्यापैकी 2 गुन्हे उघड होऊन 12 आरोपींना पकडण्यात यश आलेले आहे.मात्र,यामधील जप्त केलेली रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

अनोऴखी व्यक्तीकडूतन येणारी लिंक ओपन करु नये,अदृष्य हव्यास करु नये,चुकीच्या भूलथापा, आमिषाला बळी पडू नये,अनोळखी व्यक्तीसमवेत जास्त बोलणे टाळावे, कोणतीही बँक तुम्हाला व्यक्तिगत कॉल करत नाही,कागद चुकीने लोन अ‍ॅपचे डाऊनलोड करुन पैशांच्या मागे धावू नका,जर सोशल मीडियावरुन बदनामी होण्याचा प्रकार घडत असेल तर स्थानिक पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा.

रिझवाना नदाफ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे विभाग,अलिबाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news