

नाते : किल्ले रायगडावरील गंगासागर तलावामध्ये शनिवारी (दि.२६) एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या मयत व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर खिशात सापडलेल्या ओळखपत्रानुसार त्याचे नाव रमेश दत्तू आंब्राळे असे असून तो रा.आभ्रळ, महाबळेश्वर येथील रहिवासी आहे, असे समजले.
मयत रमेश दत्तू आंब्राळे याला एकटेपणाची आवड होती. त्याचप्रमाणे तो थोडा मंद देखील होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार वी.वी. महाडिक हे करत आहेत.