

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात गेल्या 48 तासात मुसळधार पावसाच्या नोंद 164 मी मी नोंदविण्यात आली असली तरी सोमवारी दिवस रात्री फक्त 7 मि.मी. पाऊस पडला आहे.
रविवारी दुपारीनंतर रात्री 12 वाजेपर्यंत पावसाने अतिवृष्टी सारखे रुद्र रूप दाखवत नदीतील पाणी पाणी साठ्यात दुथडी रूपांतर करत जलदगतीने वाहण्यास नवसंजीवनी मिळाली असल्याचे पाहवयास मिळाले तर कापडे खुर्दजवळ मातीचा ओसरा त्याच प्रमाणे कुडपण गावात पोल पडणे मातीचा ओसरा खाली आल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सांयकाळी झालेल्या मुसळधार पावसाने काही तासासाठी जनजीवन विस्कळीत झाले ते सोमवारी सकाळी पूर्वपदावर आले असल्याने रस्त्यावर कामानिमित्त वर्दळ दिसून आली.
पोलादपूर तालुक्यातील वाकन, कोंढवी, पोलादपूर, कुडपण दाभिल, चिरेखिड, कीनेश्वर, तुर्भे, भोगाव, दिविल, देवळे, ढवळे आदींसह इतर गावात पडणार पाऊस व डोंगरे भाग व घाट माथ्यावर कोसळणार्या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या 110 टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या वर्षी वेधशाळा ने नोंदविले निर्देश लक्षात घेता या वर्षी तालुक्यात सरासरी पेक्षा 30 टक्के पाऊस जास्त पडण्याची शक्यता वाढीस लागली आहे.
2023 मध्ये तालुक्यातील 4 हजार 109 मि.मी. पाऊस पडला होता तर 2024 मध्ये जून महिण्यात 616 मि.मी. तर जुलै महिन्यात 2191 मि.मी. , ऑगस्ट महिण्यात 942 मि.मी. सप्टेंबर आजपर्यत 570 मि.मी. पावसाची नोंद एकूण 4 हजार 319 मि.मी. झाली होती तालुक्यातील सरासरी 3686 मी मी पाऊस पडत असल्याचे दर्शविले जात असले तरी तालुक्यातील पावसाचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे या वर्षी आजपर्यत 4 हजार 071 मी मी पाऊस झाला या वर्षी असून येणार्या काही दिवसात यामध्ये वाढ होणार आहे.
पावसाळी हंगामात मे महिन्यात पासून या मार्गावर लहान मोठी झाड पडण्याच्या घटनेला सुरवात झाली आणि जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसल्याने भय इथले संपत नसल्याचे अधोरेखित होत आहे ते आजपर्यत कायम राहिले आहे.
आपत्तीचे भय कायम
पोलादपूर तालुक्यातील आपत्तीचे भय कायम राहिले असून मुसळधार पावसात दरडीसह झाडे पडण्याच्या घटना गतवर्षी प्रमाने कायम राहिल्या आहेत. दरम्यान दरडी चे सातत्य आंबेनली घाटात कायम राहिल्याने सदरचा मार्ग 1 महिना बंद ठेवण्यात आला होता. जुलै महिन्यात तालुक्यातील आंबेनली घाटसह जुना कशेडी घाट कशेडी बंगला मार्गे, कशेडी बोगदाच्या मार्गवर, पलचिल मार्गवर, कुडपण मार्गवर दरड कोसल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.