Panvel bus Accident : पनवेलमध्ये NMMT बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित; बसचे मोठे नुकसान
Panvel bus Accident
पनवेलमध्ये NMMT बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
Published on
Updated on

पनवेल : पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून निघताना एनएमएमटी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना सोमवारी (दि.२५) घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवत चालकाने बस नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केल्याने जीवीतहानी टळली. मात्र, यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे.

एनएमएमटी बस (क्रमांक MH४३-H- ५३३४) कल्याणहून पनवेल बसस्थानकात आली. त्यांनतर तेथून परत मार्गस्थ होताना बसचे ब्रेक फेल झाले. चालकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान दाखवत बसचे स्टेअरिंग बाजूच्या रेल्वे संरक्षण भिंतीच्या दिशेने वळवले. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र रेल्वेच्या संरक्षण भिंतीचे व बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news