Water supply issue : निकोप गावातील सात घरे नळाच्या पाण्यास वंचित

मानिवली नळ योजना कार्यन्वित असताना मिळत नाही पाणी
Water supply issue
निकोप गावातील सात घरे नळाच्या पाण्यास वंचित pudhari photo
Published on
Updated on

नेरळ ः आनंद सकपाळ

कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रामपंचायतीची नळ पाणी योजना कार्यन्वित असताना, ग्रामपंचाय हद्दीतील निकोप गावातील सात घरे या नळाच्या पाण्यापासून वंचित असुन, या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार करून सुध्दा दखल घेतली जात नसल्याने, गावात पाण्याची व्यवस्था असूनही या सात घरांना केवळ दुजाभावामुळे वगळण्यात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. प्रशासनांच्या कारभारामुळे महिलांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असुन, अर्ज करून देखील ग्रा.प. प्रशासनाकडून दूर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला आहे.

मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील निकोप या गावात ग्रामपंचायतीची नळ पाणी योजना कार्यन्वित आहे. तर या नळ पाणी योजनेतून गावातील इतर सर्व घरांना नळ पाणी पुरवठा योजनेमधून पाणी पुरवठा सुरळीत होत आहे. परंतू गावातील केवळ सात घरांतील असलेल्या नळांमधून पाणी पुरवठा होत नसल्याने, त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने, या सात घरातील ग्रामस्थांनी मानिवली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पांडुरंग म्हसे यांच्याकडे 24 फेब्रुवारी 2025 रोजी लेखी तक्रार देखील केली आहे.

मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली . ग्रामविकास अधिकारी यांच्या आश्वासनावर आम्हाला वेळ काढण्याची वेळ आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होत असताना, आमच्या सात घरांवर पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली असल्याने, पडणार्‍या पावसाचे पाणी घरातील वापरासाठी तर गावातील हरिश्चंद्र झांजे यांच्या बोरवेलमधून पिण्याचे पाणी आणण्याची वेळ आली असल्याचे या सात घरातील महिलांनी सांगीतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news