Neral railway station : नेरळ रेल्वेस्थानक कात टाकतंय

सरकते जिने सुरू, प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर ,प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त
Neral railway station modernization
नेरळ रेल्वेस्थानक कात टाकतंयpudhari photo
Published on
Updated on

नेरळ : माथेरान या लोकप्रिय पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकाचे रूप हे आता अधिक आधुनिक होत आहे. नेरळ फलाट क्रमक एकवर प्रवाशांच्या सोयीसाठी बसवण्यात आलेला स्वयंचलित सरकता पायरी मार्ग (एक्सलेटर) शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे.

या एक्सलेटरचा शुभारंभ हा मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्या हस्ते होणार होता. मात्र त्यांचा नेरळ दौरा हा पुढे ढकलल्याने अखेर रेल्वे प्रशासनाने स्वतःच हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्थानक प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

Neral railway station modernization
Raigad Crime : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; पत्नी, प्रियकरास जन्मठेपेची शिक्षा

या स्वयंचलित शिडीमार्गामुळे आता रेल्वे प्रवाशांसह अंध, अपंग, आबालवृद्धांसह नागरिकांना आज या फलाटां दरम्यान सहज आणि सुरक्षितपणे ये-जा करणे अधिक सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या डब्याजवळ आणखी एक सरकता पायरी मार्ग बसवण्याचे काम देखील मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

दररोज हजारो प्रवासी आणि पर्यटक माथेरानकडे जाण्यासाठी नेरळ स्थानकामधून प्रवास करतात. त्याच प्रमाणे नेरळ व नेरळ परिसरातील वाढते नागरिकरण पाहता प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्थानकाचे आधुनिकीकरण, पादचारी पूल, एक्सलेटर शिडी मार्ग आणि लिफ्टसारख्या सुविधांची उभारणी हाती घेतली आहे.

दरम्यान, नेरळ दोन नंबर स्थानकाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व विकास कामांमुळे नेरळ स्थानकाचे रूपच पालटणार असून, प्रवाशांना अधिक सुखसोयी, आधुनिक आणि आकर्षक वातावरणाचा लाभ मिळणार आहे.

सायंकाळी सरकत्या पायऱ्या सुरू होताच प्रवाशांनी उत्साहाने त्यांचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. गुलाबी रंगाच्या झळाळीने सजलेले लिफ्ट क्षेत्र आणि आधुनिक शिडीमार्गामुळे नेरळ स्थानक आज परिसरातील नवे आकर्षण केंद्र ठरत आहे.

Neral railway station modernization
Dapoli seagull migration : समुद्राच्या लाटांवर सीगल पक्ष्यांची मोहक झेप पर्यटकांना खुणावतेय!

आकर्षक रंग सजावट

याच भागात प्रवाशांसाठी बसवण्यात आलेली स्वयंचलित लिफ्ट देखील आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. लिफ्टच्या बाह्य भागावर दिलेल्या गुलाबी रंगाच्या शेडमुळे ती महिला प्रवाशांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. वयोवृद्ध, अपंग आणि महिला प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news