Navi Mumbai Passport Fraud | पासपोर्टसाठी बनावट शाळा सोडल्याचा दाखला; नेपाळी बहीण-भावाविरुद्ध गुन्हा

भारतीय नागरिक असल्याचा आभास निर्माण करून बनावट लिव्हिंग सर्टिफिकेट सादर; खांदेश्वर पोलिसांची कारवाई
Nepali Siblings Booked Passport Fraud
Nepali Siblings Booked Passport FraudAI Photo
Published on
Updated on

Nepali Siblings Booked Passport Fraud

पनवेल : भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी मुंबईतील एका शाळेचे बनावट शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट) तयार करून ते अधिकृत कागदपत्र म्हणून सादर करणाऱ्या नेपाळी बहीण-भावाचा डाव खांदेश्वर पोलिसांनी उधळून लावला आहे. पासपोर्ट पडताळणीदरम्यान कागदपत्रांची सखोल छाननी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी साहिल कृष्णा पांडे आणि लक्ष्मी कृष्णा पांडे (दोघे रा. सेक्टर-११, नवीन पनवेल) यांच्याविरुद्ध ३१ जुलै रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे मूळचे नेपाळचे नागरिक आहेत. भारतीय नागरिक असल्याचे भासवून पासपोर्ट मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांच्या आई मीना कृष्णा पांडे (लग्नापूर्वीचे नाव गईरे मीना पारस्कर) यांच्या नावाने मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथील सरस्वती विद्यानिकेतन शाळेचे बनावट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तयार केल्याचा आरोप आहे. हे बनावट प्रमाणपत्र त्यांनी पासपोर्ट अर्जासोबत पुरावा म्हणून सादर केले होते.

Nepali Siblings Booked Passport Fraud
Navi Mumbai TTC MIDC : टीटीसी एमआयडीसी परिसराचा कायापालट

पासपोर्ट पडताळणी सुरू असताना खांदेश्वर पोलिसांनी संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. शाळेच्या नोंदी, उपलब्ध माहिती आणि अर्जातील तपशील यांची पडताळणी केल्यानंतर सादर करण्यात आलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

प्राथमिक तपासात आरोपींनी सरकारी यंत्रणेची दिशाभूल करून भारतीय पासपोर्ट मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांची निर्मिती, त्यांचा शासकीय कामकाजासाठी वापर आणि फसवणुकीचा प्रयत्न अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.

Nepali Siblings Booked Passport Fraud
Navi Mumbai illegal constructions : बेकायदा बांधकाम प्रकरणी नवी मुंबई पालिकेचे अधिकारी गोत्यात

दरम्यान, ही बनावट कागदपत्रे नेमकी कोणी तयार केली, त्यामागे कोणते एजंट किंवा संघटित रॅकेट कार्यरत आहे का, तसेच अशाच प्रकारे इतर पासपोर्ट अर्जांमध्येही बनावट कागदपत्रांचा वापर झाला आहे का, याचाही खांदेश्वर पोलीस सखोल तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news